July 20, 2025 3:23 PM July 20, 2025 3:23 PM

views 33

पंढरपूर कॉरिडॉरसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

पंढरपूर कॉरिडॉरसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुंबईत आढावा बैठक घेतली. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख यांच्या उपस्थितीत यातील भूसंपादनासंदर्भात माहिती घेण्यात आली.   काशी-उज्जैनच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर कॉरिडॉर निर्माण करण्याचं नियोजन आहे. पंढरपूरमधे या कॉरिडॉर संदर्भातील शंका दूर करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या २५ जुलै ते पाच ऑगस्टपर्यंत ही समिती नागरिकांशी दररोज संवाद साधणर आहे.

July 19, 2025 9:30 AM July 19, 2025 9:30 AM

views 8

देशातल्या पहिल्या भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेचं मुंबईत उद्घाटन

देशातल्या पहिल्या भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेचं म्हणजेच आयआयसीटीचं उद्घाटन काल मुंबईत झालं. केंद्रिय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या आवारात उभारलेल्या या संस्थेचं उद्घाटन करण्यात आलं.   युवा पिढीला सक्षम करुन कलात्मक निर्मिती उद्योगात आधुनिकता आणण्याचा सरकारचा दृष्टीकोन आहे असं सांगून या संस्थेमुळे देशातल्या युवा पिढीसाठी संधींची नवी कवाडं खुली होतील असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितल...

July 18, 2025 8:01 PM July 18, 2025 8:01 PM

views 17

‘जनसुरक्षा विधेयक’ हे लोकशाही पद्धतीनं तयार केलं गेलं – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जनसुरक्षा विधेयक हे लोकशाही पद्धतीने, विरोधी पक्षांच्या सदस्यांचं म्हणणं ऐकून घेऊन तयार केलं गेलं, याबाबतच्या समितीतल्या कुणीही असहमती दर्शवली नाही, मात्र विरोधकांनी नंतर दबाव आल्यामुळे सभागृहात वेगळी भूमिका घेतली, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी पावसाळी अधिवेशनानंतर वार्ताहरांशी बोलताना केला.   जनसुरक्षा कायद्यात कसलीही स्पष्टता नसल्यानं त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या कायद्याला विरोध असल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, या विधेयकाच्या विर...

July 16, 2025 7:26 PM July 16, 2025 7:26 PM

views 26

‘वाढवण बंदर’ केवळ बंदर नव्हे तर एक आर्थिक क्रांती घडवून आणणारा केंद्रबिंदू ठरेल – मुख्यमंत्री

वाढवण बंदराच्या उभारणीमुळे महाराष्ट्र आणि भारत सागरी महासत्ता होण्याच्या दिशेनं  वेगानं  वाटचाल करत असून, हा प्रकल्प केवळ बंदर नव्हे तर एक आर्थिक क्रांती घडवून आणणारा केंद्रबिंदू ठरेल, असं  प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे.   राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय, बंदरे विभाग, आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीनं आयोजित ‘सागरी शिखर परिषद २०२५’ चं  उद्घाटन करताना ते बोलत होते.   भविष्यात भारत हा जागतिक सप्लाय चेनमधला महत्वाचा भागीदार बनू शकतो. म्हणूनच केंद्र सरकारनं ‘इंडिया...

July 16, 2025 3:28 PM July 16, 2025 3:28 PM

views 17

शेतकऱ्यांना सौर वीज घेण्याची सक्ती नाही- देवेंद्र फडणवीस

शेजारी राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दर कमी असून शेतकऱ्यांना सौर वीज घेण्याची सक्ती नाही मात्र, त्यांच्या सौर ऊर्जेशी संबंधित अडचणी समजून घेऊन त्यावर प्राधान्याने उपाय शोधले जात आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.   वीज दरवाढीचा प्रश्न अभिजीत वंजारी यांनी उपस्थित केला होता.पूर्वीच्या काळात शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोलर बूस्टर पंप पेक्षा, आता दिले जाणारे पंप अधिक सक्षम आहेत, असं सांगून  मुख्यमंत्री म्हणाले की,  सोलर पंपसंबंधी शेत...

July 15, 2025 3:13 PM July 15, 2025 3:13 PM

views 13

आर्थिक फसवणुक करणाऱ्यां विरोधात दंडाची रक्कम वाढविण्यासाठी येणार- मुख्यमंत्री

मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात शिक्षेची आणि दंडाची रक्कम वाढविण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात संबंधित आरोपी कंपनीची मालमत्ता शोधणं, त्यांचं मूल्यांकन करून खटल्याचा जलद निपटारा करण्यात पोलिसांना मदत करण्यासाठी राज्य सरकार विशेष व्यवस्था निर्माण करेल. यात आर्थिक क्षेत्रातल्या तज्ज्ञांसह मूल्यांकनासाठी खासगी कंपन्यांची मदत घेऊ असंही ते म्हणाले. यासंदर्भात अमोल खताळ यांनी मूळ प्रश्न उपस्थित क...

July 14, 2025 3:05 PM July 14, 2025 3:05 PM

views 11

वारंवार अटक होऊनही जामिनावर सुटणाऱ्या आरोपींच्या कायद्यात दुरुस्ती करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

राज्यात अमली पदार्थांच्या विक्रीत वारंवार अटक करण्यात येऊनही जामीनावर सुटणाऱ्या आरोपींना मोक्का लावण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे आणि कायदेशीर अज्ञान असणाऱ्या आरोपींचे वय कमी करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.   अमली पदार्थांच्या धंद्यात अल्पवयीन मुलांना सामील करुन घेण्यात येते आणि त्यांच्यामार्फत हे पदार्थ विक्री करून कायद्यातून पळवाट काढण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यामुळे कायद्याच्या व्याख...

July 11, 2025 4:01 PM July 11, 2025 4:01 PM

views 16

राज्यभरातल्या ३ हजार तीनशेहून अधिक धार्मिक स्थळांवरचे भोंगे हटवल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

राज्यभरातल्या एकंदर ३ हजार ३६७ धार्मिक स्थळांवरचे भोंगे आत्तापर्यंत हटवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेवरच्या चर्चेदरम्यान दिली. मुंबईत १ हजार ६०० हून अधिक ठिकाणचे भोंगे हटवले आहेत.   ही कारवाई सामंजस्याने, धार्मिक तणाव निर्माण होऊ न देता केल्याबद्दल त्यांनी मुंबई पोलिसांचं कौतुक केलं. हटवलेले भोंगे पुन्हा लावले तर तिथल्या पोलीस ठाण्यातल्या प्रभारी अधिकाऱ्याला जबाबदार धरलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

July 8, 2025 3:04 PM July 8, 2025 3:04 PM

views 13

कायदा सुव्यवस्थेसाठी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे जिल्ह्यात मीरा भाईंदर इथं हिंदी भाषिक व्यापाऱ्यांच्या मोर्चानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी एकीकरण समिती यांच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र मोर्चा मार्गाचा आंदोलकांनी धरलेला आग्रह कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु शकत होता म्हणून पोलिसांनी परवानगी नाकारली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते आज विधानभवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणं योग्य नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.    दरम्यान...

July 8, 2025 3:29 PM July 8, 2025 3:29 PM

views 18

ग्रंथालयांच्या अनुदानात ४० % वाढ करण्याच्या प्रस्तावाला मान्यता

ग्रंथालयांच्या अनुदानात ४० टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव तातडीने वित्त विभागाकडे पाठवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यातल्या अर्धशतक पार केलेल्या सार्वजनिक ग्रंथालयांना प्रोत्साहनपर विशेष अनुदान मंजूर करायलाही मान्यता मिळाली आहे.   राज्यातल्या विद्यापीठं आणि अशासकीय महाविद्यालयांमधल्या रिक्त पदांची भरती, शासन अनुदानित अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरती या मागण्यांनाही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे...