June 2, 2025 3:19 PM June 2, 2025 3:19 PM

views 16

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूर-मुंबई महामार्गावरील समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते ५ जून रोजी नागपूर- मुंबई महामार्गावरील ७६ किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्यातल्या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. नाशिकच्या इगतपुरी ते ठाण्यातल्या आमणे यांना जोडणारा हा ७०१ किमी लांबीच्या हाय-स्पीड कॉरिडॉरचा शेवटचा टप्पा आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यामुळे समृद्धी महामार्गावरुन आता नागपूर ते मुंबई थेट प्रवास करता येणार असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

June 1, 2025 3:42 PM June 1, 2025 3:42 PM

views 13

नाशिकमधे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

त्र्यंबकेशर आणि नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक इथं १३ प्रमुख आखाड्यांचे महंत, साधुसंत, सर्व प्रमुख पुरोहीत संघाचे प्रतिनिधी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली.    कुंभमेळ्याच्या आयोजनाच्या दृष्टीनं करायच्या कामांसाठी ४ हजार कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत, त्यापैकी काही अंतिम टप्प्यात आहेत, तसंच आणखी २ हजार कोटी रुपयांच्या निविदा काढणार असल्याचं त्यांनी या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं.   कुंभमेळ्याच्या अनुषंगानं गोद...

June 1, 2025 1:32 PM June 1, 2025 1:32 PM

views 12

मुख्यमंत्री सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक घेणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर असून ते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी नाशिक मधल्या तीन आणि त्र्यंबकेश्वर मधल्या दहा आखाड्यांचे महंत उपस्थित राहणार आहेत. नाशिकमधल्या कुंभमेळा पर्वाच्या तारखा यावेळी घोषित केल्या जातील. यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात उभारलेल्या उत्कृष्टता केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

May 31, 2025 6:21 PM May 31, 2025 6:21 PM

views 33

अहिल्याबाई होळकर यांनी केलेलं कार्य तीनशे वर्षांनीही प्रेरणादायी-मुख्यमंत्री

अहिल्याबाई होळकर यांच्या राजवटीत कृषी, कर आणि न्याय पद्धती आदर्श होती. त्यांनी केलेलं कार्य तीनशे वर्षांनीही प्रेरणादायी आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं आयोजित जयंती उत्सवात ते बोलत होते. यावेळी  विविध विकासकामांचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला.    अहिल्याबाईंनी दलित, वंतितांच्या उत्थानासाठी अनेक योजना आणल्या, एवढं मोठं ऐश्वर्य असूनही त्यांनी साधी राहणी स्वीकारली म्हणूनच त्यांना पुण्यश्लोक म्हणतात, असं फडणवीस म्हणाले. मंद...

May 14, 2025 7:50 PM May 14, 2025 7:50 PM

views 9

मेट्रोच्या कामापैकी ५० किमीचे टप्पे वर्षअखेरपर्यंत पूर्ण करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मुंबई मेट्रोच्या कामापैकी ५० किलोमीटरचे टप्पे या वर्षी, तर ६२ किलोमीटरचे टप्पे पुढच्या वर्षअखेरपर्यंत पूर्ण करू, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. फडणवीस यांच्या उपस्थितीत दहिसर ते काशीगाव या मेट्रोच्या टप्प्याची तांत्रिक तपासणी आज झाली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. तांत्रिक तपासणीनंतर मेट्रोचा हा टप्पा प्रवाशांसाठी खुला होईल, पश्चिम द्रुतगती मार्गावरची वाहतूक कोंडी कमी व्हायला यामुळे मदत होईल, असं फडणवीस यावेळी म्हणाले. नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापासून बांद्र्यापर्य...

May 14, 2025 3:26 PM May 14, 2025 3:26 PM

views 8

रे रोड केबल स्टेड रोड ओव्हरब्रिज आणि टिटवाळा रोड ओव्हर ब्रिजचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

संपूर्ण राज्य रेल्वेफाटकमुक्त करायच्या उद्देशानं महारेलनं राज्यभरात मोठ्या प्रमाणात रेल्वे पूल बांधण्याचं काम हाती घेतलं असून यापैकी ३२ पूल पूर्ण झाले आहेत, तर या वर्षी २५ पूल पूर्ण होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. रे रोड केबल स्टेड रोड ओव्हरब्रिज आणि टिटवाळा रोड ओव्हर ब्रिजचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. रे रोड केबल स्टेड ब्रिज हा महारेलनं बांधलेला मुंबईतला पहिला केबल स्टेड रोड ओव्हरब्रिज असून त्याचं काम अतिशय अडचणीच्या परिस्थितीत, वाहतुकीला कमीत कमी अडथळा आणून...

May 12, 2025 3:24 PM May 12, 2025 3:24 PM

views 8

राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयानं काम करेल- मुखमंत्री

भारतीय सैन्याने ज्या ताकदीनं आणि अचूकतेनं ऑपरेशन सिंदूर राबवलं ते अभूतपूर्व असून राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयानं काम करेल, असं मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांची संयुक्त बैठक आज वर्षा या निवासस्थानी झाली त्यावेळी  ते बोलत होते.   राज्यातल्या सुरक्षेवर आणि सज्जतेवर झालेल्या या बैठकीत गुप्तचर माहितीचं आदानप्रदान झालं. तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि यापुढे घेण्याच्या खबरदारीबद्दल, तसंच संर...

May 2, 2025 8:46 PM May 2, 2025 8:46 PM

views 22

चित्रपट चित्रीकरणासाठी दोन अत्याधुनिक स्टुडियो उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी महाराष्ट्रात दोन अत्याधुनिक स्टुडिओ उभारले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केली. मुंबईत सुरू असलेल्या वेव्हज् परिषदेत भारत पेव्हेलियनला मुख्यमंत्र्यांनी आज भेट दिली, त्यावेळी त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. या दोन स्टुडिओच्या उभारणीसाठी प्राईम फोकस आणि गोदरेजसोबत सामंजस्य करार केले आहेत. या स्टुडिओंमधे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रीकरण करता येईल, असं त्यानी सांगितलं. गोदरेजच्या सहाय्यानं पनवेलमधे दोन हजार एकर जागेवर चित्रनगरी उभा...

April 27, 2025 7:05 PM April 27, 2025 7:05 PM

views 13

राज्यात प्रत्येकाला घराजवळ दर्जेदार आरोग्यसुविधा मिळावी याकरता त्रिस्तरीय यंत्रणा उभारणार

राज्यात प्रत्येकाला घरापासून जवळ दर्जेदार आरोग्यसुविधा मिळावी याकरता त्रिस्तरीय यंत्रणा पुढच्या ३ ते ४ वर्षांत उभी करण्यात येणार असल्याचं मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. छत्रपती संभाजीनगरमधे शासकीय कर्करोग रुग्णालयात ट्रू बीम युनिट या अत्याधुनिक यंत्रप्रणालीचं आणि संस्थेच्या विस्तारित भागाचं लोकार्पण आज केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते झालं, त्या कार्यक्रमात अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते. कर्करोगावर रेडिएशन उपचार आता छत्रपती संभाजीनगरमधे उपलब्ध होतील असं मुख्यमं...

April 19, 2025 4:03 PM April 19, 2025 4:03 PM

views 16

समुद्रातलं 53-TMC पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचं काम सुरु होणार-मुख्यमंत्री

समुद्रात वाहून जाणारं त्रेपन्न टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या योजनेला मान्यता दिली असून या वर्षाअखेर किंवा पुढल्या वर्षाच्या सुरुवातीला हे काम सुरू होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बीड जिल्ह्यातल्या घाटशील पारगाव इथं ‘नारळी सप्ताह’ सांगता  समारोहात ते आज बोलत होते. कृष्णा  कोयनेच्या पुराचं पाणी मराठवाड्यात आणण्याच्या योजनेलाही मंजुरी दिली असून पुढल्या महिन्यात याची निविदा काढली जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. अहिल्यानगर आणि साेलापूर दाेन्ही बाजूने उजनी धरणातू...