November 9, 2025 9:00 AM
32
गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेत अमूलाग्र परिवर्तन घडून येईल – मुख्यमंत्र्यांचा विश्वास
आरोग्य व्यवस्था भक्कम झाल्यामुळं गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेत अमूलाग्र परिवर्तन घडून येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अहेरी इथल्या महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता २ हजार ४०० आजारांचा समावेश करण्यात आला असून, त्याचा फायदा गोरगरीब नागरिकांना होईल असं त्यंनी सागितलं. कोठी आणि रेगडी इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र, वेंगणूर इथलं उपकेंद्र, जारावंडी आणि ताडगाव इथल्या प्राथम...