October 12, 2025 4:42 PM October 12, 2025 4:42 PM
43
कायदेमंडळ, मंत्रिमंडळ आणि न्यायपालिका यांनी एकमेकांविरुद्ध काम करू नये, सरन्यायाधीशाचं प्रतिपादन
कायदेमंडळ, मंत्रिमंडळ आणि न्यायपालिका हे प्रशासनाचे तिन्ही स्तंभ देशाच्या नागरिकांना न्याय देण्यासाठीच काम करतात, त्यांचं अधिकारक्षेत्र स्वतंत्र असलं, तरी त्यांनी एकमेकांच्या विरोधात काम करू नये, असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज केलं. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड इथं दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचं उद्घाटन न्यायमूर्ती गवई यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. गेल्या काही काळात न्यायपालिकेच्या विविध पायाभूत सुविधांच्या विकासात राज्य सरकारची भूमिका मोठी आहे, असे गौरवोद्...