December 9, 2025 7:21 PM December 9, 2025 7:21 PM

views 18

अनिल अंबानीच्या २ कंपनी विरोधात सीबीआयकडून FIR दाखल

सुमारे १४ हजार ८०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयनं अनिल धीरुभाई अंबानी उद्योगसमूहातल्या दोन कंपन्यांविरोधात आज  एफआयआर दाखल केले. रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स विरोधात हे गुन्हे दाखल झाले आहेत.    युनियन बँकेला २२८ कोटी रुपयांना फसवल्या प्रकरणी कंपनीचा तत्कालीन संचालक - अनिल अंबानींचा पुत्र जयअनमोल अंबानी तसंच कंपनीचा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शरद सुधाकर यांना आरोपी बनवलं आहे.    बँक ऑफ महाराष्ट्रला ५७ कोटी रुपयांना फसवल्याचाही कंपनी...

December 1, 2025 8:04 PM December 1, 2025 8:04 PM

views 20

देशभरात डिजिटल अटक फसवणूक प्रकरणांचा तपास सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवला

देशभरात डिजिटल अटक फसवणूक प्रकरणांचा तपास आज सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवला. देशात डिजिटल अटक घोटाळे, गुंतवणूक घोटाळे आणि अंशकालीन कामासंबंधीचे घोटाळे या तीन प्रकारचे सायबर घोटाळे होत असल्याची माहिती, सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठाला ॲमिकस क्युरिए अर्थात न्यायमित्रांनी दिली. अशा प्रकरणांमध्ये नागरिकांना अमिष दाखवून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली जात असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली आणि त्यातही, विशेषतः डिजिटल अटकेच्या प्रकरणांचा तपास सीब...

August 23, 2025 2:53 PM August 23, 2025 2:53 PM

views 14

अनिल अंबानी यांच्याशी संबंधित आस्थापनांवर सीबीआयचे छापे

सीबीआयनं आज मुंबईत अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशनच्या कार्यालयावर छापे टाकले. स्टेट बँकेकडून कर्ज घेतलेल्या सुमारे २ हजार ९०० कोटी रुपयांच्या कर्जाप्रकरणी मुंबईत हे छापे पडले. १३ जून रोजी स्टेट बँकेनं रिलायन्स कम्युनिकेशनला दिलेलं कर्ज 'फसवणूक' या श्रेणीत वर्ग केलं होतं. कर्जाच्या रकमेचा गैरवापर केल्याचा बँकेचा दावा आहे.   १७ हजार कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीनं अनिल अंबानी यांचं कार्यालय आणि इतर ठिकाणी छापे टाकून काही वस्तू जप्त केल्या होत्या, तसंच त्यांची चौकशी...

August 10, 2025 3:32 PM August 10, 2025 3:32 PM

views 7

नाशिकमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा CBI कडून पर्दाफाश

सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं नाशिकमध्ये इगतपुरी इथं सुरु असलेल्या एका बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणी सीबीआयनं मुंबईतल्या सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यातल्या पाच जणांना अटक केली आहे. ॲमेझॉन या ई-कॉमर्स संकेतस्थळाचं ग्राहक मदत केंद्र असल्याचं भासवून या कॉल सेंटरवरुन ग्राहकांना फसवणूक करणारे फोन केलेे जात होते. गिफ्ट कार्ड तसंच क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीतले फोनकॉल अमेरिका, कॅनडा आणि अन्य देशांच्या नागरिकांना करुन त्या माध्यमातून फसवणूक केली जात होती. आरोपींनी ...

July 11, 2025 12:56 PM July 11, 2025 12:56 PM

views 17

अंमली पदार्थ प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड आरोपी कुब्बावाला मुस्तफा याला भारतात आणण्यामध्ये यश

  अंमली पदार्थ प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड आरोपी कुब्बावाला मुस्तफा याला संयुक्त अरब अमिरातहुन भारतात आणण्यामध्ये केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय ला  यश आलं आहे.   सांगली इथं परदेशातून सिंथेटिक ड्रग्ज मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी चालवल्याचा आरोप मुस्तफावर आहे. कुब्बावाला मुस्तफा आणि इतरांशी संबंधित असलेल्या कारखान्यातून २ पूर्णांक ५२२ दशलक्ष रुपये किमतीचे एकूण १२६  किलो मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे.

June 11, 2025 3:19 PM June 11, 2025 3:19 PM

views 15

सायबर गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करून सीबीआय २ कोटी ८० लाख रुपयांची क्रिप्टोकरन्सी केली जप्त

सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागानं सायबर गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करून २ कोटी ८० लाख रुपयांची क्रिप्टोकरन्सी जप्त केली आहे. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठीच्या चक्र-५ या मोहिमेअंतर्गत झालेल्या या कारवाईत तीन ठिकाणी सीबीआयनं छापे टाकले. ओळख लपवून आंतरराष्ट्रीय फोन करण्यासाठीची यंत्रणा, तसंच सायबर गुन्हेगारीसाठी वापरलं जाणारं इतर साहित्य सीबीआयनं जप्त केलं.   तसंच एकाला अटकही करण्यात आली. त्याच्याकडे २२ लाखाची रोख रक्कम सापडल्याची माहितीही सीबीआयनं पत्रकाद्वारे दिली आहे. ही टोळी सरक...

April 14, 2025 1:53 PM April 14, 2025 1:53 PM

views 12

फरार हिरे व्यापारी मेहुल चौकसीला बेल्जियममध्ये अटक

सीबीआयच्या विनंतीवरुन फरार हिरे व्यापारी मेहुल चौकसी याला बेल्जियम पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. पंजाब नॅशनल बँकेतल्या साडे १३ हजार कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणी त्याच्याविरोधात मुंबईतल्या न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं होतं. याप्रकरणातला दुसरा आरोपी नीरव मोदीचं लंडनमधून प्रत्यार्पण व्हायचं आहे. घोटाळा उघड होण्याच्या काही दिवस आधी, जानेवारी २०१८ मध्ये तो देशाबाहेर पळून गेला होता.    चौकसी याची अटक हे मोठं यश आहे. गरीबांचे पैसे लुटणाऱ्यांना, हे पैसे परत करावेच लागतील, असं प्रधानमंत्...

April 11, 2025 7:28 PM April 11, 2025 7:28 PM

views 25

Nashik : भ्रष्टाचार प्रकरणी लष्कराच्या १५ अधिकाऱ्यांच्या विरोधात सीबीआय कारवाई

नाशिकच्या तोफखाना केंद्र आणि आर्मी एव्हिएशन सेंटरमधील १५ अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआयनं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत कारवाई केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.    सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक इथल्या तोफखाना केंद्र आणि आर्मी एव्हिएशन सेंटरमध्ये काम करणारे लेखापरीक्षक, सहाय्यक लेखाधिकारी आणि लिपिकांनी वेतन आणि भत्ते वेळेवर देण्यासाठी लष्करी कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळले. सीबीआय आणि पुण्याच्या संरक्षण लेखा नियंत्रका...

March 23, 2025 3:37 PM March 23, 2025 3:37 PM

views 33

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून बंद

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं बंद केला आहे. या प्रकरणी सीबीआयनं दोन वेगवेगळे क्लोजर रिपोर्ट दाखल केले. एका तक्रारीत सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर आरोप केले होते. याचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयनं पाटणा इथं विशेष न्यायालयात दाखल केला. दुसरी तक्रार अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिनं सुशांतच्या बहिणींविरोधात मुंबईत दाखल केली होती. त्याचा क्लोजर रिपोर्ट मुंबईत विशेष न्यायालयात सादर करण्यात आला.

February 11, 2025 8:24 PM February 11, 2025 8:24 PM

views 13

तटरक्षक दलाचे माजी महासंचालक के नटराजन यांच्याविरुद्ध सीबीआय FIR

तटरक्षक दलाचे माजी महासंचालक के नटराजन यांच्याविरुद्ध सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालात छेडछाड केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. संरक्षण मंत्रालयाने पाठवलेल्या निवेदनावरुन सीबीआयने गेल्या वर्षी एप्रिलमधे प्राथमिक चौकशी सुरु केली.