May 26, 2025 3:38 PM May 26, 2025 3:38 PM

views 19

गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय कर्करोग संस्थेत स्वस्ती निवासचं भूमिपूजन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नागपूरजवळ जामठा इथल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेत स्वस्ती निवासचं भूमिपूजन, कामठी इथं राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठाची पायाभरणी झाली. नॅशनल कँसर इन्सिट्यूट ही आगामी काळात देशातल्या प्रमुख कॅन्सर इन्स्टिट्यूटपैकी एक असेल असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.  मध्यप्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश स्वस्ती आणि तेलंगणा या सर्व ठिकाणचे रुग्ण इथे उपचार घेऊ शकतील याबद्दल शाह यांनी समाधान व्यक्त केलं.  गेल्या दहा वर्षात देशातलं वैद्यकीय क्षेत्राचं चित्र बदललं असल्...