April 7, 2025 7:32 PM April 7, 2025 7:32 PM
9
नाशिकच्या काळाराम मंदिराचे अध्यक्ष बदलण्याचे न्यायालयाचे आदेश
नाशिकमधल्या काळाराम मंदिर विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांना काढून टाकून दुसऱ्या अध्यक्षाची नियुक्ती करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. काळाराम मंदिरातल्या पुजाऱ्यांना नैवेद्यासाठी दिली जाणारी रक्कम परत सुरू करण्याची मागणी पुजाऱ्यांनी न्यायालयात केली होती. यासंदर्भात अध्यक्षांनी तडजोडीसाठी बैठक घ्यावी असं न्यायालयाने सूचित केलं होतं. मात्र त्यांनी कार्यवाही केली नसल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने अध्यक्ष बदलण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसंच पुजारी वर्गाला प्रलंबित रकमेसह १२ टक्के ...