January 15, 2025 2:38 PM

views 67

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती आलोक आराधे

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींच्या बदल्या केल्या आहेत. तेलंगण उच्चन्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांना दिल्ली उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश पद मिळालं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने गेल्या ७ जानेवारीला त्यांच्या बदलीची शिफारस केली होती. 

December 19, 2024 1:50 PM

views 18

रवींद्र वायकरांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका फेटाळली

गेल्या लोकसभा निवडणुकीत वायव्य मुंबई मतदारसंघातले शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळली. वायकर यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल किर्तीकर यांनी ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी ती फेटाळली आहे. मतमोजणीच्या वेळी तथाकथित वादग्रस्त मतं वायकर यांना कशी मिळाली, हे सिद्ध करण्यात कीर्तीकर अपयशी ठरले असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.

October 24, 2024 2:52 PM

views 36

पोर्श कार प्रकरण : अरुणकुमार सिंह यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला

पुण्यात कल्याणीनगर इथं २ मोटारसायकल प्रवाशांना धडक देणाऱ्या पोर्श गाडीतल्या अरुणकुमार सिंह यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयानं काल फेटाळून लावला. घटनेनंतर मद्यपानाचे पुरावे लपवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलून तपास यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आरोपीच्या  रक्ताच्या नमुन्याची  अदलाबदल करण्यासाठी सिंह यांनी ससून रुग्णालयातल्या डॉक्टरांना लाच दिल्याचे प्रथमदर्शनी पुरावे असल्याचं न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी म्हटलं आहे.

October 1, 2024 8:39 PM

views 31

बदलापूर प्रकरण : संस्थेच्या विश्वस्तांना अटक न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या दोन आरोपींना पोलिसांनी अद्याप पकडलं नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.  या प्रकरणी स्वतःहून दखल घेऊन चालवलेल्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती रेवती मोहिते- डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलिसांच्या निष्क्रीयतेवर ताशेरे ओढले. या प्रकरणातले दोन आरोपी संबंधित शाळेचे विश्वस्त असून ते अद्याप फरार आहेत.    या आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर होण्याची वाट पहात आहात का असा सवाल खंडपीठानं पोलिसांना केला. विशेष तपास पथकाचे प्रमुख स...

September 27, 2024 7:31 PM

views 26

येत्या सोमवारपर्यंत अक्षय शिंदे मृत्यूप्रकरणी अहवाल सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचं दफन करावं आणि येत्या सोमवारपर्यंत त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.    आरोपी अक्षय शिंदे याचा गेल्या रविवारी पोलीस चकमकीत मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचं दफन करायला स्थानिक रहिवाशांकडून प्रचंड विरोध झाला. त्याबाबत आरोपीच्या वडलांनी आज न्यायालयात दाद मागितली, तेव्हा दफनासाठी राज्यसरकार जागा उपलब्ध करुन देईल, असं सरकारी वकिलांनी सांगितलं. 

September 26, 2024 9:29 AM

views 20

बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिस चकमकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून शंका व्यक्त

बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूच्या घटनेला चकमक मानणं शक्य नसल्याचं निरीक्षण, मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या पीठानं काल झालेल्या सुनावणीत हे मत व्यक्त केलं. या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी अपेक्षित आहे, तशी ती होत नसल्याचं दिसलं, तर आम्हाला आदेश काढावा लागेल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

September 21, 2024 6:59 PM

views 35

अधिसभेची निवडणूक उद्याच घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुंबई विद्यापीठाला आदेश

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक उद्याच घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं विद्यापाठीला दिले आहेत. या निवडणुकीची सर्व तयारी झालेली असताना राज्य सरकारच्या आदेशावरुन काल अचानक विद्यापीठानं ही निवडणूक स्थगित केली होती. त्याला युवासेनेच्या मिलिंद साटम, शशिकांत झोरे आणि प्रदीप सावंत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या नेतृत्वाखालील विशेष खंडपीठानं तातडीची सुनावणी घेतली आणि उद्याच निवडणूक घेण्याचे आदेश दिले.

September 10, 2024 6:58 PM

views 30

ईद-ए-मिलाद दरम्यान डीजे आणि प्रखर प्रकाशझोतांवर बंदीची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

आगामी ईद-ए-मिलाद दरम्यान डीजे आणि प्रखर प्रकाशझोतांवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. राष्ट्रीय हरित लवादानं याआधीच गणेशोत्सवाच्या काळात डीजे आणि प्रखर प्रकाशझोतांवर बंदी घातलेली आहे, त्यामुळे न्यायालयाने या जनहित याचिकेचा विचार करावा, अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वकिलानं केली, मात्र, यावर बंदी हरित लवादानं घातली असेल...

September 10, 2024 8:52 AM

views 36

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचवण्यासाठी ७ सदस्यीय समितीची स्थापना

शाळा, शालेय आवार तसंच शाळेसाठीच्या वाहतुकीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीचं नेतृत्व निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती शालिनी फणसळकर-जोशी या करणार आहेत. या समितीनं २९ ऑक्टोबरपर्यंत आपल्या शिफारशी आणि सूचनांचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.

August 30, 2024 7:20 PM

views 21

पीओपीच्या गणेशमूर्तींवर तूर्त बंदी नाही, मात्र… – मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

यंदाच्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरची बंदी तूर्त टळली आहे. पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका मूर्तिकार आणि पर्यावरणवाद्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आज मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या पीठासमोर सुनावणी झाली.    गणेशोत्सव अवघा काही दिवसांवर आल्यामुळे यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालता येणार नाही. मात्र, राज्य सरकारनं केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या २०२० च्या मार्गदर्शक ...