October 4, 2024 5:31 PM October 4, 2024 5:31 PM
5
निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाची निवडणूक संचालन समितीची स्थापना
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश भाजपानं निवडणूक संचालन समिती स्थापन केली असून रावसाहेब दानवे तिचे अध्यक्ष आहेत. जाहीरनामा समितीची जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर असून त्याकरता नागरिकांनी सूचना पाठवाव्यात असं आवाहन मुनगंटीवार यांनी केलं आहे. या समितीत चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य नेत्यांचा समावेश आहे.