November 17, 2024 7:02 PM November 17, 2024 7:02 PM
12
भाजपनं देशात फूट पाडण्याचं काम केलं असल्याची मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका
पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या नेत्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलं. पण, भारतीय जनता पार्टीने मात्र देशात फूट पाडण्याचं काम केलं अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज केली. नागपूरजवळ उमरेड इथे प्रचारसभेत ते बोलत होते. राज्यात आता मतदारांना सरकार बदलायचं आहे आणि हे खोटं सरकार पाडायचं आहे, असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं. त्यानंतर खर्गे यांनी सांगली इथंही प्रचारसभा घेतली. महाराष्ट्रातलं सरकार हे चोरीचं सरकार असल्याची टीका या...