March 6, 2025 8:03 PM

views 41

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून पुन्हा निवड

झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी यांची आज विधिमंडळ पक्षनेते म्हणून पुन्हा निवड झाली.  केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि खासदार के लक्ष्मण यांनी मरांडी यांच्या नावाची घोषणा केली. झारखंड विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारीही मरांडी यांच्याकडे आहे.

February 20, 2025 8:18 PM

views 34

दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी घेतली शपथ

भाजपा नेत्या रेखा गुप्ता यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. रामलीला मैदानावर झालेल्या या सोहळ्यात दिल्लीचे नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.    गुप्ता यांच्यासह ६ कॅबिनेट मंत्र्यांनीही आज शपथ घेतली. यामध्ये परवेश साहिब सिंह वर्मा, आशीष सूद, मनजिन्दर सिंह सिरसा, रविंद्र इन्द्राज सि...

February 19, 2025 1:37 PM

views 21

दिल्ली भाजप विधिमंडळ पक्षाची नवी दिल्लीत बैठक

दिल्ली विधानसभेतल्या भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक आज संध्याकाळी नवी दिल्लीत होणार आहे. पक्षाचे नवनिर्वाचित आमदार आणि वरिष्ठ नेते यात सहभागी होतील. दिल्लीच्या  नव्या मुख्यमंत्र्याचं नाव या बैठकीतच ठरवलं जाईल, नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी सोहळा उद्या रामलीला मैदानावर  होणार आहे.

February 8, 2025 8:13 PM

views 22

दिल्लीत विकास, व्हिजन आणि विश्वासाचा विजय झाला असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून समाधान व्यक्त

दिल्लीत आज विकास, व्हिजन आणि विश्वासाचा विजय झाला असून ढोंग, अराजकता आणि संकटाचा पराभव झाला आहे, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल समाधान व्यक्त केलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. भाजपा कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच हे शक्य झालं असून त्यासाठी त्यांचं अभिनंदन करतो, असंही मोदी म्हणाले. या निवडणुकीवेळी आपण प्रत्येक दिल्लीकराच्या नावे पत्र लिहून विनंती केली होती की दिल्लीला विकसित भारताची विकसित राजधानी बनवण्यासाठी संधी द्या...

January 21, 2025 7:36 PM

views 35

छत्रपती संभाजीनगर इथल्या शिवसैनिकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

संभाजीनगर इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी अनेक पदाधिकारी तसंच शिवसैनिकांसोबत आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

January 21, 2025 3:32 PM

views 28

दिल्ली निवडणुकांसाठी भाजपाच्या संकल्प पत्राचा दुसरा भाग जाहीर

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या संकल्प पत्राचा दुसरा टप्पा भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्लीत प्रसार माध्यमांसमोर आज जाहीर केला. या संकल्पपत्रात दिल्लीतल्या तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी १५ हजार रुपयांची मदत, तसंच दोन वेळचा प्रवास आणि अर्ज शुल्काची परतफेड करण्याचं आश्वासन दिलं आहे. भाजपाचं सरकार आल्यास गरजू विद्यार्थाचं केजीपासून ते पदव्युत्तर पदवीपर्यंतचं शिक्षण सरकारी शैक्षणिक संस्थांमार्फत मोफत दिलं जाईल, अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिकण...

January 12, 2025 8:09 PM

views 19

महाराष्ट्रात भाजपाला मिळालेला प्रचंड जनादेश हे कार्यकर्त्यांचे समर्पण- अमित शाह

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधी पक्षांना एकही जागा मिळणार नाही असं नियोजन करण्याचं आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केलं. प्रदेश भाजपाच्या शिर्डी इथं झालेल्या अधिवेशनात ते बोलत होते. महाविकास आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे, असं सांगत शहा यांनी  शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कठोर टीका केली. राज्याला अस्थिरतेतून बाहेर काढून एक मजबूत स्थिर सरकार देण्याचं काम जनतेनं केलं असंही अमित शहा  म्हणाले.    विधानसभा निवडणुकीत पक...

January 7, 2025 4:50 PM

views 16

भाजपाचं राज्यात दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट

नवीन सदस्यनोंदणी अभियानात दीड कोटी प्राथमिक तर ५ लाख सक्रीय सदस्य मिळवण्याचं प्रदेश भाजपाचं उद्दिष्ट असल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. मुंबईत आज ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. येत्या १० जानेवारीला घर चलो अभियान सुरु करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अहिल्यानगर इथं येत्या १२ जानेवारीला होणाऱ्या कार्यकारिणी बैठकीत सुमारे १५ हजार कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्घाटनसमारंभाला उपस्थित राहणार असून समारोप भाजपाचे राष्ट...

January 3, 2025 9:47 AM

views 23

भाजपच्या पक्षांतर्गत निवडणुकासांठी विविध केंद्रीय मंत्र्याची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती

भारतीय जनता पार्टीनं प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांच्या निवडणुकांसाठी निवडणूक अधिकारी नियुक्त केले आहेत. त्यामध्ये केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची गुजरातसाठीनिवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून शिवराजसिंह यांच्याकडे कर्नाटकची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या कडे बिहारसाठी नियुक्ती करण्यात आली असून धर्मेंद्र प्रधान मध्य प्रदेशातल्या पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवती...

December 28, 2024 8:08 PM

views 14

प्रदेश भाजपाच्या संघटनात्मक समित्या जाहीर

प्रदेश भाजपने आपल्या संघटनात्मक समित्या आज जाहीर केल्या. प्रदेश संघटनपर्व समितीच्या प्रदेश प्रभारीपदी माजी मंत्री रवींद्र चव्हाण आणि प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार अनिल सोले यांची नियुक्ती झाली आहे. तर प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि अभियान सहप्रमुख म्हणून प्रवीण घुगे यांची नियुक्ती करण्यात आल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.