November 24, 2025 7:17 PM

views 63

मुंबई पालिका निवडणुकीत भाजपचे ४० टक्के उमेदवार तरुण असतील – मुख्यमंत्री

तरुणाईच्या माध्यमातून समाजात आणि राजकारणात परिवर्तन शक्य असल्याचं सांगत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे ४० टक्के उमेदवार हे तरुण असतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित I I M U N मुंबई-२०२५ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी युवावर्गाशी संवाद साधला. यावेळी युवावर्गासाठीच्या अनेक योजना  आणि मुंबईतल्या महत्त्वाच्या प्रकल्पांविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.  मुंबईत वाहतुकीचं मोठं जाळं तयार करण्यात सरकारला यश आलं असून पुढच्या पाच ते सात वर्षांत मुंब...

November 22, 2025 6:04 PM

views 33

२०२९ पर्यंत काँग्रेस पक्षाचं अस्तित्व फार शिल्लक राहणार नाही- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये प्रचंड विसंगती असल्यानं हा पक्ष देशातून हद्दपार होत आहे. २०२९ पर्यंत या पक्षाचं अस्तित्व फार शिल्लक राहणार नाही, असं  मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्यक्त केलं. गडचिरोली इथं भाजपच्या नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं.त्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते.

November 5, 2025 4:02 PM

views 23

भाजपा नेते किरेन रिजीजू यांची राहुल गांधीवर टीका

बिहारच्या निवडणुकीत यश मिळणार नाही हे लक्षात आल्यावर काँग्रेस नेता राहुल गांधींनी हरियाणातला बनावट मतदारांचा मुद्दा उपस्थित केल्याची टीका केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते किरेन रिजीजू यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत केली. हरियाणात काँग्रेसचा पराभव झाल्याबद्दल राहुल गांधी भाजपाला दोष देत आहेत. मात्र काँग्रेस अंतर्गत विसंवादामुळे त्यांचा पराभव झाल्याचं त्यांच्याच नेत्या कुमारी शैलजा यांनी सांगितलं होतं, असं रिजीजू म्हणाले. निवडणुकीत भाजपाने हस्तक्षेप केल्याचा आरोप फेटाळून लावत गांधी विदेशात जाऊन ...

October 14, 2025 8:23 PM

views 121

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची पहिली उमेदवार यादी

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची ७१ उमेदवारांची पहिली उमेदवार यादी आज जाहीर झाली. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी तारापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा, लखीसराईतून निवडणूक लढवतील. मंगल पांडेय, नितीन नबीन, रेणू देवी, या आजी-माजी मंत्रिमंडळ सदस्यांचा यादीत समावेश आहे. केंद्रीय मंत्री रामकृपाल यादव यांना दानापूरमधून तिकिट मिळालं आहे. हिंदुस्थानी आवामा मोर्चानंही ६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान भक्तिसंगीत गायिका मैथिली ठाकूरनं आज पाटणा इथं भाजपात प्रवे...

July 5, 2025 8:14 PM

views 33

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात मराठी ऐवजी सत्तेची लालसा दिसून आल्याची भाजपा आणि शिवसेनेची टीका

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात मराठी भाषेच्या आडून द्वेष आणि आगपाखड दिसून आल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महाराष्ट्र गीताला राज्यगीताचा दर्जा आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही महायुती सरकारनेच मिळवून दिल्याची आठवणही शिंदे यांनी यावेळी करून दिली.  

July 2, 2025 8:40 AM

views 166

भारतीय जनता पार्टीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड

भारतीय जनता पार्टीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. मुंबईतल्या वरळी इथं काल झालेल्या राज्य परिषदेच्या अधिवेशनात केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी चव्हाण यांना निवडीचं प्रमाणपत्र प्रदान केलं. चव्हाण यांनी मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पदाची सूत्रं स्वीकारली.

June 17, 2025 3:36 PM

views 37

जनगणना प्रक्रियेविषयी काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याचा भाजपचा आरोप

जनगणना प्रक्रियेविषयी काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपानं केला आहे. पक्षाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं की, सरकारनं जनगणना करण्याची घोषणा केली असून सामाजिक, आर्थिक आणि जातीय जनगणना होईल, असं स्पष्ट केलं आहे.   केंद्र सरकारनं काल जनगणनेची अधिसूचना जारी केली, त्यात जातनिहाय जनगणना होईल, असा स्पष्ट उल्लेख नसल्याचा दावा काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केला आहे. त्यावर त्रिवेदी उत्तर देत होते. जातनिहाय जनगणनेचं काम तेलंगण सरकारनं उत्कृष्टर...

May 13, 2025 1:42 PM

views 24

भाजपतर्फे आजपासून तिरंगा यात्रेचं आयोजन

'ऑपरेशन सिन्दूर' बाबत जनजागृतीच्या उद्देशानं  भारतीय जनता पक्षानं  आजपासून देशभरात जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेला त्यांनी 'तिरंगा यात्रा' असं नाव दिलं असून पाकिस्तानविरोधात भारतीय लष्करानं केलेल्या यशस्वी कारवायांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. राजधानी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर आज संध्याकाळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे.    या मोहिमेत माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था तसंच भाजपचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत. ही मोहिम २३ मेपर्यंत चालणार असून त्यात पाकिस्तान...

April 22, 2025 6:54 PM

views 27

काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आज मुंबईत आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.   भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.

March 18, 2025 7:35 PM

views 39

सीताराम घनदाट यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी आज भाजपात प्रवेश केला. मुंबईतल्या भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.   घनदाट यांच्या बरोबर परभणी जिल्हा परिषदेचे अनेक माजी सदस्य, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंचांसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रसाद बुधवंत, 'वंचित' आघाडीचे नेते सुरेश फड, यांच्यासह अनेकांनी भाज...