May 30, 2025 7:53 PM May 30, 2025 7:53 PM

views 18

बिहारमध्ये विविध विकासकामांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधल्या काराकट इथं ४८ हजार ५०० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली. यात साडेपाच हजार कोटी रुपयांचा चौपदरी पाटणा - गया - दोभी महामार्ग, २४९ कोटींचा गोपालगंज महामार्ग यांचाही समावेश आहे. रालोआ सरकार बिहारच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील आहे, लोकांपर्यंत शांतता, सुरक्षा आणि शिक्षण पोहोचवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.   वाहतूक, ऊर्जा, रेल्वे आदी क्षेत्रांना या प्रकल्पांमुळे लाभ होणार आ...

April 27, 2025 6:59 PM April 27, 2025 6:59 PM

views 21

बिहारच्या महाबोधी मंदिरात सर्वात मोठ्या ‘सिंगिंग बाऊल ऑन्साँबल’चा गिनीज बुक विक्रम

बिहार मध्ये बौद्ध भिक्खून्नी मधुबनी चित्रकला आणि गानकटोरा  सादरीकरणाच्या विविध श्रेणींमध्ये २ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त केली आहेत. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी पाटणा इथं पाटलीपुत्र क्रीडा संकुलात मुख्यमंत्री नितीश कुमार यांना प्रमाणपत्र प्रदान केली. कलाकारांनी पद्मश्री जगदंबा देवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रसिद्ध कलाकार बौआ देवी यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास १९ चौरस मीटरचं मोठं चित्र बनवलं. तर बौद्धगया इथं काल संध्याकाळी ३७५ बौद्ध भिक्खून्नी एकत्र येत गानकटोरा सादरीकरणात विश्व...

April 24, 2025 11:44 AM April 24, 2025 11:44 AM

views 18

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते बिहारमध्ये विकास कामांचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहारला भेट देणार असून, मधुबनी इथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते सहभागी होतील. या प्रसंगी, 13 हजार 480 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानच्या हस्ते होणार असून, रेल्वे आणि वीज क्षेत्रातील काही प्रकल्पाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. यात, जयनगर ते पाटणा दरम्यान धावणाऱ्या नमो भारत रॅपिड रेल्वे आणि सहरसा ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेसला दू...

April 9, 2025 8:40 PM April 9, 2025 8:40 PM

views 11

बिहारमध्ये वीज कोसळून १३ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये वीज कोसळल्याच्या घटनेत मृत पावलेल्यांची संख्या १३ वर पोहोचली आहे. यातील ५ जण बेगुसराई जिल्ह्यातले असून ३ जण मधुबनी जिल्ह्यातले आहेत तर दरभंगा इथले २ आणि समस्तीपूर इथला एकजण या दुर्घटनेत दगावला. बिहार राज्यात अन्यत्र देखील पाऊस सुरु असून त्यात ५ जण मृत्युमुखी पडले तर ४ जण जखमी झाले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबियांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. 

April 1, 2025 2:06 PM April 1, 2025 2:06 PM

views 9

हिरो आशिया चषक हॉकी स्पर्धा यावर्षी बिहारमधे राजगीर इथं होणार

हिरो आशिया चषक हॉकी स्पर्धा यावर्षी ऑगस्ट मध्ये बिहारमधे राजगीर इथं होणार आहे. या संदर्भात हॉकी इंडिया आणि बिहार राज्य क्रीडा प्राधिकरण यांच्यात पाटणा इथं सामंजस्य करार करण्यात आला. अलीकडेच बांधण्यात आलेल्या राजगीर हॉकी स्टेडियममध्ये २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा होईल. राजगीर इथं आयोजित केली जाणारी ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल. १२ व्या हिरो आशिया चषक स्पर्धेत भारत, पाकिस्तान, जपान, कोरिया, चीन आणि मलेशियासह एकंदर ८ संघ भाग घेतील.  

March 30, 2025 8:40 PM March 30, 2025 8:40 PM

views 15

बिहारमधे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाप्रणित लोकशाही आघाडीच्या नेत्यांची बैठक

बिहारमधे यावर्षी विधानसभा निवडणूक होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी आज भाजपाप्रणित लोकशाही आघाडीच्या नेत्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत भाजपा, जनतादल संयुक्त, लोकजनशक्ती पार्टी, हिंदुस्तानी अवाम मोर्चा, आणि राष्ट्रीय लोक मोर्चा या सर्व घटक पक्षांचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. बिहार विधानसभेत यावेळी २२५ जागा मिळवण्याचं उद्दिष्ट रालोआनं निश्चित केलं असून त्या दृष्टीनं रणनीती आखण्यावर या बैठकीत ...

March 30, 2025 2:14 PM March 30, 2025 2:14 PM

views 14

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते बिहारमध्ये ८०० कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज बिहारमधे सुमारे ८०० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमीपूजन केलं. सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या १११ कोटी रुपये खर्चाच्या आणि नगरविकास आणि गृहनिर्माण खात्याच्या अखत्यारीतल्या ४२१ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. पोलिसांसाठीच्या सदनिकांचं तसंच ३ महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामाची कोनशिला त्यांनी बसवली.   दरभंगा इथल्या मच्छिमार सहकारी संस्थेत मखाणा प्रक्रीया उद्योगाचं उद्घाटन त्यांनी दूरस्थ पद्धतीने केलं. बिहार ...

February 19, 2025 10:07 AM February 19, 2025 10:07 AM

views 20

बिहारमध्ये ३४५ कोटींहून अधिक रकमेच्या १६९ विकास प्रकल्पांचं उद्घाटन

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या प्रगती यात्रेदरम्यान, काल त्यांनी कैमूर जिल्ह्यात सुमारे ३४५ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या, १६९ विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. कैमूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचं काम लवकरच सुरू होईल असं आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना केलं. या यात्रेदरम्यानच नितीश कुमार यांनी, एका पदवी महाविद्यालयाचं उद्घाटन केलं, तसंच सोन नदी-कोहिरा नदी जोड प्रकल्पाची पाहणी केली.

November 30, 2024 2:39 PM November 30, 2024 2:39 PM

views 10

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत. मधुबनी जिल्ह्यातल्या क्रेडिट आऊटरीच कार्यक्रमात त्या सहभागी होणार आहेत. या दौऱ्यादरम्यान विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी त्या संवाद साधतील. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्या स्वयं अर्थसहाय्यता गट, रोजगाराभिमुख योजना आणि अन्य क्षेत्रातल्या लाभार्थ्यांना एक हजार कोटी रुपयांहून अधिकची ऋण स्वीकृत्री पत्रं वितरित करणार आहेत.

November 30, 2024 10:21 AM November 30, 2024 10:21 AM

views 9

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात क्रेडिट आउटरीच कार्यक्रमात सहभागी होणार आहेत

सरकारनं किसान क्रेडिट कार्ड योजनेचा विस्तार मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि इतर क्षेत्रांमध्ये करून त्यात वैविध्य आणल्याचं दरभंगा इथं झालेल्या पतपुरवठा संपर्क कार्यक्रमात बोलताना निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. केंद्रीय अर्थसंकल्प आता महिलाकेंद्री ऐवजी महिलाप्रधान झाला असून येत्या काही वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यास याची देशाला मदत होईल, असं त्या यावेळी म्हणाल्या. बचत गटांना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण आणि कौशल्य वाढीच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या ड्रोन दीदी प्रकल्पांचाही त्...