November 6, 2025 1:25 PM November 6, 2025 1:25 PM

views 117

Bihar Election : पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरु

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला आज सात वाजता सुरुवात झाली. १८ जिल्ह्यात मिळून १२१ मतदारसंघामध्ये १हजार ३१४ उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होईल. सकाळी ११ वाजेपर्यंत २७ पूर्णांक ६५ शतांश टक्के मतदान झालं . सर्वात जास्त मतदानाची नोंद बेगुसरायमधे ३० पूर्णांक ३७ शतांश टक्के इतकी झाली.   बिहार विधानसभेसाठी आज पहिल्या टप्प्याचं मतदान १२१ जागांवर होत असून बिहारची राजधानी पाटणा, वैशाली, नालंदा, भोजपूर, मुंगेर, सारण, सिवान, बेगुसराय, लखीसराय, गोपाळगंज, मुझफ्फरपूर, ...

November 5, 2025 8:00 PM November 5, 2025 8:00 PM

views 28

बिहार विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार शिगेला

बिहार विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. रालोआ तसंच महायुतीच्या स्टार प्रचारक आणि ज्येष्ठ नेत्यांनी सीमांचल, चंपारण आणि मेगध क्षेत्रासह विविध भागात प्रचारसभा घेतल्या.    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पूर्व आणि पश्चिम चंपारण, मधुबन इथं सभा घेतल्या.     संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अरारिया, कटिहार आणि कृष्णगंज इथं सभा झाल्या. तर भाजपचे ज्येष्ठ  नेते राजनाथ सिंह यांनी जमुई आणि बांका इथं सभा घेतल्या.    उत...

November 2, 2025 6:42 PM November 2, 2025 6:42 PM

views 41

बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार शिगेला

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. विविध पक्षांचे प्रमुख नेते आणि स्टार प्रचारक राज्यभर सभांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत आहेत. पहिल्या टप्प्यात १२२ मतदारसंघांमध्ये येत्या गुरुवारी ६ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.   भोजपूर जिल्ह्यात आरा इथं झालेल्या सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, एनडीएचा जाहीरनामा हा बिहारच्या विकासासाठीचा प्रामाणिक प्रयत्न आहे.  शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सिंचन या क्षेत्रांवर विशेष लक्ष दिलं असून महिलांना सक्षम करण्यासा...

October 27, 2025 7:50 PM October 27, 2025 7:50 PM

views 39

मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण बारा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधे करणार-ECI

मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण बारा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधे करणार असल्याचं निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. मतदारयाद्या अधिक पारदर्शक आणि निर्दोष करणं हे याचं उद्दिष्ट आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. दुसऱ्या टप्प्यात सखोल पुनरीक्षण टप्प्याटप्प्याने राबवलं जाईल, असं ज्ञानेश कुमार म्हणाले. एकही मतदार यादीतून वगळला जाऊ नये आणि चुकीची व्यक्ती यादीत समाविष्ट होऊ नये ही मतदार नोंदणी अधिकाऱ्याची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. 

October 25, 2025 1:41 PM October 25, 2025 1:41 PM

views 33

Bihar Election: प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साहित्याचा वापर करताना स्पष्ट उल्लेख करणं बंधनकारक

बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगानं राजकीय प्रचारादरम्यान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृत्रिम सामग्रीचं  प्रकटीकरण आणि जबाबदार वापराबाबतच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने  बनवलेली अथवा बदल केलेली प्रतिमा, ऑडिओ संदेश अथवा  दृकश्राव्य संदेश प्रचारासाठी वापरताना त्यावर ए-आय निर्मित, डिजिटली वर्धित अथवा कृत्रिम सामुग्री, असा स्पष्ट उल्लेख करणं, तसंच प्रदर्शित केल्या जाणाऱ्या प्रचार सामुग्रीच्या  १० टक्के भागात स्पष्ट...

October 13, 2025 3:26 PM October 13, 2025 3:26 PM

views 37

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना जारी

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज जारी झाली. या टप्प्यात, 20 जिल्ह्यांमधल्या 122 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला पाररंभ झाला असून त्याची मुदत  20 ऑक्टोबर पर्यंत आहे. 21 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल, तर 23 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल.. या टप्प्यासाठी 11 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

October 9, 2025 3:17 PM October 9, 2025 3:17 PM

views 82

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात AIच्या गैरवापराबद्दल निवडणूक आयोगाचा इशारा

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधातल्या उमेदवाराला   लक्ष्य बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करु नये असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. आदर्श आचारसंहितेत या निर्देशांचा समावेश केला आहे. समाजमाध्यमांवर चुकीची, बनावट आणि दिशाभूल करणारी माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने देण्यावर बंदी घातली आहे. प्रचारातल्या चित्र, चित्रफीत अथवा ध्वनिफितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला असल्यास तसं लेबल त्यावर लावणं आवश्यक आहे. समाजमाध्यमावर सक्रीय असणाऱ्यांमुळे निवडणुकीचं वातावरण बिघडू नय...