May 10, 2025 8:06 PM May 10, 2025 8:06 PM
18
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश दरम्यान तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची २८वी बैठक आज मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथं पार पडली. तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर दोन्ही राज्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या कार्यक्रमाला उपस्थित होते. तापी मेगा रिचार्ज जगातलं एक आश्चर्य आहे. या परियोजनेमुळे महाराष्ट्राची दोन लाख ३० हजार हेक्टर आणि मध्य प्रदेशची सुमारे एक लाख ३१ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे, असं मुख्य...