October 16, 2025 3:01 PM October 16, 2025 3:01 PM

views 64

कोकण रेल्वेत साडे चारशे पदांच्या भरतीचा प्रस्ताव

कोकण रेल्वेत साडे चारशे पदांच्या भर्तीसाठी रेल्वे मंत्रालयाला अर्ज करण्यात आला असून येत्या एक ते दोन महिन्यात त्याबद्दल अनुमोदन मिळण्याची शक्यता असल्याचं कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी सांगितलं आहे. ते काल कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या पस्तिसाव्या स्थापना दिनानिमित्त वाशी इथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.   स्थानिक पदभरती प्रक्रिया राबवली जात असून येत्या २७ ऑक्टोबर रोजी ७९ जागांसाठी परीक्षा होणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. कोकण रेल्वेला कर्जाची परतफेड करण्यासाठी ७ हजार ७७६ को...