July 11, 2025 3:37 PM July 11, 2025 3:37 PM

views 21

भंडारा जिल्ह्यातील चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक

भंडारा जिल्ह्यातल्या विविध भागात दुकानाचं शटर तोडून दुचाकी, मोबाईलची चोरी करणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं  अटक केली आहे. आरोपींकडून १० मोबाईल, ३ इअरबड्स,  ४ स्मार्ट वॉच, आणि दोन दुचाकी असा  ३ लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे. 

July 5, 2025 7:29 PM July 5, 2025 7:29 PM

views 19

भंडारा ते नागपूर या रस्त्याच्या सहापदरीकरणाचं काम पुढील चार महिन्यात सुरू होईल – मंत्री नितिन गडकरी

भंडारा ते नागपूर या रस्त्याच्या सहापदरीकरणाचं काम पुढील चार महिन्यात सुरू होईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज भंडारा इथं केली. राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील भंडारा बायपास तसंच मौदा वाय जंक्शन इथल्या सहा पदरी उड्डाणपुलाचं लोकार्पण आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.  

May 30, 2025 7:36 PM May 30, 2025 7:36 PM

views 17

भंडारा जिल्ह्यात बोगस खत आढळल्याप्रकरणी दोघांना अटक

भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कृषी केंद्रात १२९ मेट्रिक टन बोगस खत आढळल्याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  सचिवासह दोघांना अटक झाली आहे. तर खत कंपनीचा मालक आणि वितरक याना अटक करण्यासाठी पोलीस रवाना झाले आहेत.

May 29, 2025 8:16 PM May 29, 2025 8:16 PM

views 14

भंडारा जिल्ह्यात अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं बिबट्या ठार

भंडारा जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्गावरच्या कोकणागड फाट्याजवळ एका अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं बिबट्या जागीच ठार झाला. धारगाव परिसर हा जंगलव्याप्त असून परिसरात नेहमी वन्य प्राण्यांचा वावर असतो.    बिबट्या रस्ता ओलांडत काल रात्री साडेआठवाजता  त्याचा मृत्यू झाला असून याची माहिती वन विभागाला देण्यात आली. बिबट्याचा मृतदेह गडेगाव येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.

May 28, 2025 3:37 PM May 28, 2025 3:37 PM

views 14

भंडाऱ्यामधे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रात १२९ मेट्रिक टन बोगस खतांचा साठा जप्त

भंडाऱ्यामध्ये  लाखनी इथं कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रात सुमारे  १२९  मेट्रिक टन बोगस मिश्र खतांचा साठा आढळून आला आहे. मिश्र खताच्या नमुन्याची अमरावतीमधल्या खत नियंत्रण प्रयोगशाळेत तपासणी केली असता नमुने अप्रमाणित ठरले आहेत. विशेष म्हणजे संबंधित खत उत्पादन कंपनी आणि  वितरक तसेच विक्रेत्यांकडे महाराष्ट्र राज्यातील खत उत्पादन आणि विक्री संबंधीचे कोणतेही परवाने नसल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.

April 27, 2025 3:12 PM April 27, 2025 3:12 PM

views 7

भंडाऱ्यात सुगंधी तंबाखू वाहून नेणाऱ्या गाडीवर कारवाई

भंडारा जिल्ह्यातल्या गोबरवाही गावात पोलिसांनी सुगंधी तंबाखू वाहून नेणाऱ्या गाडीवर कारवाई करत ७ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी ही कारवाई केली. पोलिसांनी ३० प्लॅस्टिकच्या गोणी जप्त केल्या असून या प्रकरणी २ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.  

April 22, 2025 3:14 PM April 22, 2025 3:14 PM

views 18

भंडारा जिल्ह्यात २ गाड्यांची टक्कर होऊन झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात पाथरी इथं काल रात्री एक दुचाकी आणि चारचाकी गाडीची टक्कर होऊन झालेल्या अपघातात ४ जण मृत्युमुखी पडले. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

April 11, 2025 3:35 PM April 11, 2025 3:35 PM

views 17

भंडारा जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई

भंडारा जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करत लाखनी पोलिसांनी दोन विनाक्रमांक ट्रॅक्टर आणि ११ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या गस्ती पथकानं यापैकी एक ट्रॅक्टर मुंडीपार सडक शिवारात तर दुसरा लाखनी परिसरात जप्त केला. 

March 10, 2025 5:26 PM March 10, 2025 5:26 PM

views 12

भंडारा जिल्ह्यात २२ लाखांहून अधिक किंमतीचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त

भंडारा जिल्ह्यात कारधा पोलिसांनी २२ लाखांहून अधिक किमतीचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त केला. छत्तीसगड मधून हे पदार्थ राज्यात आणले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी गुटखा, लोखंडी चॅनल आणि वाहतूक करणारा ट्र्क असा एकूण ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

March 5, 2025 3:39 PM March 5, 2025 3:39 PM

भंडाऱ्यात भुमिगत खाणीत झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात चिखला इथे भूमिगत खाणीत अपघात होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी नऊ ते साडे नऊ वाजण्याच्या सुमाराला खाणीतल्या स्लॅब कोसळून त्याखाली तीन कामगार दबले गेले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला तर एक कामगार जखमी झाला. जखमी कामगाराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.