June 15, 2025 3:21 PM June 15, 2025 3:21 PM

views 19

एसटी महामंडळाची उद्यापासून एसटी पास थेट तुमच्या शाळेत मोहीम सुरू

एसटी  बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून एसटी महामंडळ "एसटी पास थेट तुमच्या शाळेत" ही विशेष मोहीम राबवणार आहे. या मोहिमेतून विद्यार्थ्यांना एसटीचे पास त्यांच्या शिक्षणसंस्थांमधून वितरीत केले जाणार आहेत.  परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला तसे निर्देश  दिले आहेत.  शासनाकडून विद्यार्थ्यांना  मिळणारी सवलत तसंच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत विद्यार्थीनींना दिले जाणारे मोफत प्रवासाचे पास त्यांना एसटी आगारातून घ्यावे लागत होते.  परंतु...

May 8, 2025 7:56 PM May 8, 2025 7:56 PM

views 27

मुंबईत बेस्ट बसच्या प्रवासभाड्यात वाढ !

मुंबईत बेस्ट उपक्रमावरचं आर्थिक संकट दूर करण्यासाठी बेस्ट बसच्या किमान प्रवासभाड्यात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय उद्यापासून लागू होणार आहे. साध्या बसकरता पहिल्या पाच किलोमीटरसाठी १० रुपये, तर वातानुकूलित बसकरता पहिल्या पाच किलोमीटरसाठी १२ रुपये प्रवाशांना मोजावे लागणार आहे. १० किलोमीटरसाठी १० ऐवजी १५ रुपये, १५ किलोमीटरसाठी १५ ऐवजी २० रुपये, २० किलोमीटरसाठी २० ऐवजी ३०, २५ किलोमीटरसाठी २० ऐवजी ३५, तर पुढं प्रत्येक ५ किलोमीटरसाठी ५ रुपये वाठीव प्वासभाडं द्यावं लागणार आहे.    मासिक पास ९०० रुपया...

April 25, 2025 7:25 PM April 25, 2025 7:25 PM

views 17

बेस्टनं स्वत:चे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईतल्या नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी बेस्टनं  अत्याधुनिक बस आणि प्रभावी सोयीसुविधा पुरवतानाच, स्वत:चे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावेत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिल्या. ते आज मुंबईत बेस्टच्या आढावा बैठकीत बोलत होते.    मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात वाहतुकीसाठी तीन टक्के राखीव तरतूद केली तर याचा बेस्टला फायदा होईल, असं त्यांनी सांगितलं.    टोल माफ करावेत, कर्मचाऱ्यांच्या देण्यापोटी १ हजार ६५८ कोटी रुपये मिळावेत, सरकारी कर माफ करावा, अशा मागण्या बेस्टचे व...

February 14, 2025 7:37 PM February 14, 2025 7:37 PM

views 20

मुंबईत बेस्ट बसचा प्रवास महागणार !

मुंबईत बेस्ट बसचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांनी काल अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. बेस्टचा तोटा भरून काढण्यासाठी भाडेवाढ हा एकमेव उपाय असल्याने त्यावर विचार सुरू आहे. अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही, अशी माहिती श्रीनिवासन यांनी दिली आहे. 

January 13, 2025 8:44 PM January 13, 2025 8:44 PM

views 53

गेल्या ५ वर्षात बेस्ट बस झालेल्या ८३४ अपघातात ८८ नागरिकांचा मृत्यू

गेल्या ५ वर्षात बेस्ट बस झालेल्या ८३४ अपघातात ८८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या कालावधीत मृत्यू पावलेल्या आणि जखमी झालेल्यांना ४२ कोटी ४० लाख रुपयांची भरपाई दिल्याचं बेस्टनं माहितीच्या अधिकारात केलेल्या अर्जात सांगितलं आहे. या अपघातांमुळं १२ कर्मचारी बडतर्फ झाले तर २४ जणांचं निलंबन झालं. गेल्या ५ वर्षात बेस्टच्या मालकीच्या बसचे ३५२ अपघात  झाले आणि कंत्राटदारांच्या बसचे ४८२ अपघात झाल्याचं बेस्टनं म्हटलं आहे.

January 12, 2025 8:13 PM January 12, 2025 8:13 PM

views 17

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या नव्या बसगाड्या दाखल

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात या वर्षी अडीच हजारांहून जास्त स्वमालकीच्या नव्या बसगाड्या दाखल होत असून याद्वारे राज्याच्या प्रत्येक रस्त्यावर नवी एसटी धावताना दिसेल, असं प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. ते आज ठाणे इथं राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी १७ नव्या गाड्यांचं लोकार्पणही झालं. स्वच्छतेसह सुरक्षित प्रवासाला महत्त्व देत एकूणच परिवहन सेवेचं चित्र बदलण्याचा आराखडा बनवला जात असून टप्प्याटप्प्यानं एसटीच्या आधुनिकीकरणाला स...

December 18, 2024 7:28 PM December 18, 2024 7:28 PM

views 13

एसटी प्रवास भाड्यात साडेचौदा टक्के वाढ प्रस्तावित-भरत गोगावले

एसटी प्रवास भाड्यात साडेचौदा टक्के वाढ प्रस्तावित असल्याचं एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी आज सांगितलं. ते नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही प्रश्न आहे. या सगळ्याचा आर्थिक बोजा पेलता यावा, यासाठी भाडेवाढ करावी लागणार आहे, असं  त्यांनी सांगितलं.  येत्या वर्षभरात सुमारे साडे ३ हजार बस खरेदी केली जाणार आहे. शक्यतो भंगार किंवा जुनाट बसगाड्या काढून टाकून नवीन गाड्या खरेदी करण्याकडे राज्य परिवहन महामंडळाचा कल आहे. सुमारे १ हजार ३०० नवीन गाड्या भाडेतत्त्वावर ...

July 31, 2024 7:08 PM July 31, 2024 7:08 PM

views 15

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी !

गणपती उत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरता एसटी महामंडळानं यंदा २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४ हजार ३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांमधल्या प्रमुख बसस्थानकांमधून या जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. या गाड्या आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्यांचं आरक्षण बसस्थानकावर, किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे.   गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी बसस्थान...

June 25, 2024 7:30 PM June 25, 2024 7:30 PM

views 19

‘बेस्ट’ बससेवेला आर्थिक सहाय्य करण्याची आमदार आदित्य ठाकरे यांची मागणी

मुंबईतल्या ‘बेस्ट’ बस सेवेला आर्थिक सहाय्य करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना पत्रद्वारे केली आहे. गेल्या दोन वर्षांत बेस्टकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला. बेस्ट बसची भाडेवाढ करू नये, कर्मचाऱ्यांना वेतन आणि निवृत्तीवेतन वेळेवर मिळावं आणि बसच्या संख्येतली नियोजित वाढ तातडीन अमलात आणावी अशा मागण्याही ठाकरे यांनी या पत्राद्वारे केल्या आहेत.