December 31, 2024 3:26 PM December 31, 2024 3:26 PM
7
मस्साजोग सरपंच हत्याप्रकरणी फरार वाल्मिक कराड पोलिसांना शरण
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे आज पुण्यातल्या सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले. शरण येण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून यात त्यांनी स्वत:वरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्यावर राजकीय द्वेषापोटी आरोप करण्यात आले असून चौकशीअंती आपण दोषी आढळलो तर शिक्षा भोगण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. [video width="848" height="480" mp4="https://www.newsonair.gov.in/wp-content/uploads/2024/12/Walmik-Karad.mp4"][/vid...