April 2, 2025 7:49 PM

views 26

बीड जिल्हा बँकेला सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू – उपमुख्यमंत्री अजित पवार

बीड जिल्ह्यातून होणार स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न करू आणि बीड जिल्हा बँकेला सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. बीड दौऱ्यात ते वार्ताहरांशी बोलत होते. चूक करणाऱ्यांच्या विरोधात कोणत्याही हस्तक्षेपाची पर्वा न करता कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

March 30, 2025 3:31 PM

views 42

बीडमध्ये मशिदीत स्फोट

बीड जिल्ह्यात अर्ध मसला गावातल्या मशिदीत आज पहाटे स्फोट झाला. जिलेटीनच्या कांड्यांमुळे हा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या स्फोटात कोणीही जखमी झालेलं नाही मात्र मशिदीच्या आतल्या भागाचं नुकसान झालं आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला असून गावात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 

March 4, 2025 2:57 PM

views 83

संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बीड बंद

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आज बीड जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक परिसरात नागरिक, सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्रित आले होते. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषन विभागानं न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून जनतेनं  कायदा हातात घेऊ नये, असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं आहे. जिल्ह्यात संवेदनशील ठिकाणी पो...

February 26, 2025 8:38 PM

views 41

बीड सरपंचांच्या हत्येप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. तर, विधीज्ञ बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावर यासंदर्भातलं परिपत्रक पोस्ट करत ही माहिती दिली. 

February 18, 2025 9:22 AM

views 36

Police T20 Cricket : बीडचे पोलीस अंमलदार अमोल ससाणे यांची निवड

बीड पोलीस दलातले पोलीस अंमलदार अमोल ससाणे यांची नवी दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस टी-२० क्रिकेट स्पर्धेत निवड झाली आहे. यासाठी नुकत्याच झालेल्या निवड चाचणीत ससाणे यांनी अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान मिळवलं आहे.

January 21, 2025 7:36 PM

views 31

बीड जिल्ह्यातील १३ सरपंच आणि ४१८ सदस्यांचं सदस्यत्व रद्द

जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं बीड जिल्ह्यातील १३ सरपंच आणि ४१८ सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीच्या राखीव जागांवरून निवडून आलेल्या सदस्यांना बारा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असतं.   पण बीड जिल्ह्यातल्या आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर तालुक्यातल्या १३ सरपंच आणि ४१८ सदस्यांनी प्रमाणपत्र सादर केलं नाही. त्यामुळे त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे.

January 21, 2025 3:19 PM

views 25

बीड : जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं १३ सरपंच आणि ४१८ सदस्यांचं सदस्यत्व रद्द

जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं बीड जिल्ह्यातील १३ सरपंच आणि ४१८ सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीच्या राखीव जागांवरून निवडून आलेल्या सदस्यांना बारा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असतं. पण बीड जिल्ह्यातल्या आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर तालुक्यातल्या १३ सरपंच आणि ४१८ सदस्यांनी प्रमाणपत्र सादर केलं नाही. त्यामुळे त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. 

January 19, 2025 7:19 PM

views 31

बीड जिल्ह्यात एसटी बसची धडक लागून तीन युवकांचा मृत्यू

बीड जिल्ह्यातल्या घोडका राजुरी गावाजवळ आज सकाळी एसटी बसची धडक लागून तीन युवकांचा मृत्यू झाला. पोलिस भरतीसाठी धावण्याचा सराव करणाऱ्या या तिघांना बीडहून परभणीकडे जाणाऱ्या बसची धडक बसली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे तिघेही घोडका राजुरीचे रहिवासी होते. अपघातानंतर संतप्त जमावानं बस पेटवून दिली. पोलिसांनी बसचालकाला अटक केली आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपयांचं अर्थसहाय्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलं आहे.

January 14, 2025 8:41 AM

views 27

बीडमध्ये आजपासून २८ जानेवारीपर्यंत जमावबंदी

बीड जिल्ह्यात आजपासून २८ जानेवारीपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सध्या सुरू असलेली आणि नियोजित असलेली विविध आंदोलनं, आणि त्यातून उद्भवणारी संभाव्य परिस्थिती या पार्श्वभूमीवर हे आदेश लागू करण्यात आले आहेत.   लातूर जिल्ह्यातही अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी शस्त्रबंदी तसंच जमावबंदी आदेश जारी केले आहेत.

January 12, 2025 4:02 PM

views 29

राजमाता जिजाऊंच्या जयंतिनिमित्त राज्यभरात उत्साहात साजरी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री-राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. जिजाऊंच्या जयंती सोहळ्यानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथल्या राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी सूर्योदयावेळी शासकीय महापूजा करण्यात आली. केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रताप जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही पूजा झाली. यावेळी राजे लखोजी जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव उपस्थित होते.   बीड ...