October 22, 2025 3:07 PM October 22, 2025 3:07 PM
27
बीडमध्ये ५० हजार घरकुले विक्रमी वेळेत पूर्ण
ऐन दिवाळीत बीड जिल्ह्यात प्रधानमंत्री घरकुल आवास योजने अंतर्गत ५० हजार घरकुले राज्य सरकारच्या वतीने विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली. त्यामुळं बीड वासियांची दिवाळी नवीन घरकुलात साजरी होणार आहे. या योजनेसाठी शासनाकडून ९९० कोटीं रूपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाभार्थ्यांचे आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केलं आहे.