July 20, 2024 8:52 PM

views 15

बांगलादेशातून १ हजार भारतीय विद्यार्थी मायदेशी सुखरूप परत

बांगलादेशमध्ये सध्या सुरू असलेल्या हिंसक संघर्षाच्या काळात बांगलादेशातून सुमारे एक हजार भारतीय विद्यार्थी सुखरूप परत आले आहेत. यापैकी ७७८ विद्यार्थी जलमार्गाने, तर सुमारे दोनशे विद्यार्थी हवाई मार्गाने भारतात परत आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. ढाका इथलं भारताचं उच्चायुक्तालय, तसंच चित्तगाँग, राजशाही, सिल्हेत आणि खुलना इथली सहायक उच्चायुक्तालयं स्थानिक यंत्रणांच्या मदतीनं भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढायला मदत करत आहेत, आणि बांगलादेशातल्या विविध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत अ...

July 20, 2024 3:15 PM

views 20

बांगलादेशात हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू

बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून पसरलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच लष्कर तैनात करण्यात आलं आहे. बांगलादेशातल्या सरकारी नोकऱ्यांमधल्या आरक्षणाच्या धोरणात सुधारणा करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन पुकारलं होतं. त्याला हिंसक वळण लागून विद्यार्थी आणि पोलिसांच्यात झालेल्या संघर्षात आत्तापर्यंत १०५ जण ठार झाले आहेत.  

July 18, 2024 8:35 PM

views 20

बांगलादेशात कोटा सुधारणा आंदोलनाला हिंसक वळण

बांगला देशात कोटा सुधारणा आंदोलनाला आज हिंसक वळण लागलं आणि यात चार जणांचा मृत्यू तर शेकडो लोक जखमी झाले. या आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठी आज देशव्यापी बंद ची घोषणा केली होती आणि ढाक्यातले मुख्य महामार्ग, रेल्वे मार्ग, मेट्रो मार्गांची वाहतूक रोखली होती. बांगलादेशचे कायदा सुव्यवस्था आणि संसदीय कार्यमंत्री अनीसूल हक यांनी या आंदोलकांसोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. बांगलादेश सरकारनं पोलिसांच्या तुकड्यांसोबत सीमा सुरक्षा दलाच्या २२९ तुकड्या तैनात केल्या आहेत.   बांग्लादेशामधल्या भारतीय ...

July 18, 2024 1:32 PM

views 19

बांगलादेशात सरकारी नोकर भरतीतील कोट्यात सुधारणेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण

बांगलादेशात, सरकारी नोकऱ्यांच्या भरतीसाठीच्या कोटा प्रणालीमध्ये सुधारणा व्हावी या मागणीसाठी विद्यापीठांतील विद्यार्थी आणि शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला गेल्या दोन दिवसांत हिंसक वळण लागलं असून त्यामध्ये ६ जणांना जीव गमवावा लागला आहे तर, शेकडो जखमी झाले आहेत. यामुळे सरकारनं सर्व शैक्षणिक संस्था अनिश्चित काळासाठी बंद केल्या आहेत तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ढाका आणि इतर प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस, बॉर्डर गार्ड बांगलादेश आणि इतर निमलष्करी दलांची पथकं नियुक्त केली आह...

June 21, 2024 11:29 AM

views 29

बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

बांग्लादेशच्या प्रधानमंत्री शेख हसिना आजपासून दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची त्या भेट घेणार असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमवेत त्यांची द्विपक्षीय बैठक होईल. शेख हसीना परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांची देखील भेट घेणार आहेत.   नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच परदेशाच्या प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चेसाठी भारतात येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नवनिर्वाचित केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठीदेखील शेख हस...