July 22, 2025 8:22 PM

views 15

Bangladesh Plane Crash: मृतांची संख्या ३१ वर, तर १६५ जण जखमी

बांगलादेशात काल झालेल्या विमान अपघातातल्या मृतांची संख्या आता ३१ वर पोचली असून जखमींची संख्या १६५ वर पोचली आहे. बांगलादेशच्या आंतर सेवा जनसंपर्क संचालनालयाने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

July 16, 2025 9:46 AM

views 20

प्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे यांची वडिलोपार्जित मालमत्ता पाडू नये, असे भारताचे बांगलादेशला आवाहन

बांगलादेशातील मयमनसिंग येथील प्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या वडिलोपार्जित मालमत्ता पाडण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. भारतानेही या प्रतिष्ठित इमारतीचे जतन करण्यासाठी मदत देऊ केली आहे.   मयमनसिंगमधील या ऐतिहासिक इमारतीला पाडण्याच्या हालचालीला गंभीर दुःखद बाब म्हणून भारताने बांगलादेशला दोन्ही देशांच्या सामायिक संस्कृतीचे प्रतीक असलेल्या या इमारतीला संग्रहालयात रूपांतरित करण्याची विनंती केली. त्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.   ही प्रतिष्ठित आणि...

June 27, 2025 6:16 PM

views 2

Bangladesh : भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती स्थापन

बांगलादेशातल्या २०१४, २०१८ आणि २०२४ या ३ राष्ट्रीय निवडणुकांमधली अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी  मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालच्या हंगामी सरकारनं पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. आवामी लीगवर वाढत्या राजकीय दबावाच्या पार्श्वभूमीवर ही समिती स्थापन झाली आहे. उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालची ही समिती येत्या ३० सप्टेंबरपर्यंत आपला अहवाल सादर करेल. नागरिकांचा मतदानाचा अधिकार, लोकशाहीचं रक्षण आणि हुकूमशाहीला प्रतिबंध हा या चौकशीचा हेतू आहे. पुढच्या निवडणुका मुक्त आण...

April 28, 2025 1:33 PM

views 21

काश्मीरच्या मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तानने शांततापूर्ण मार्गानं तोडगा काढावा – बांगलादेश

काश्मीरच्या मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तानने शांततापूर्ण मार्गानं तोडगा काढावा अशी अपेक्षा बांगलादेशानं व्यक्त केली आहे. दक्षिण आशियात स्थैर्य नांदण्यासाठी हे आवश्यक असल्याचं बांगलादेशाचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार तौहिद होसैन यांनी म्हटलं आहे. ते काल ढाका इथं वार्ताहरांशी बोलत होते.

February 24, 2025 1:47 PM

views 26

बांगलादेशमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचा १११वा वर्धापन दिन साजरा

बांगलादेशामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचा १११ वा वर्धापनदिन राजधानी ढाका इथं साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृती केंद्र, ढाका इथं ‘भारतीय सिनेमाचा प्रवास’ या विषयावरील समृद्ध आणि माहितीपूर्ण प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. ढाका इथल्या भारतीय उच्चायुक्त इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आणि भारतीय उच्चायुक्तालयाने आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचं उद्घाटन बांगलादेशातील भारताचे उच्चायुक्त प्रणय वर्मा यांच्या हस्ते झालं. भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात २१ मे १९१३ रोजी राजा हरिश्चंद्र या मूकपटाच्या प्रदर्शन...

February 20, 2025 8:50 PM

views 23

भारत आणि बांगलादेश यांच्यात ५५वी महासंचालक स्तरीय सीमा परिषद

भारत आणि बांगलादेश यांच्यातली  ५५ वी महासंचालक स्तरीय सीमा परिषद आज नवी दिल्लीत झाली. भारतातर्फे सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक दलजित सिंंह चौधरी आणि बांगलादेशच्या बॉर्डर गार्डचे महासंचालक मेजर जनरल मोहम्मद सिद्दीकी यांनी भाग घेतला. या परिषदेत घुसखोरी,  सीमा भागातले गुन्हे, सीमेवर तारेचं कुंपण, तस्करी आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. सीमाभागातल्या लोकांच्या मानव अधिकाराचं रक्षण आणि सीमेवरील  हिंसाचार कमी करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

January 28, 2025 12:58 PM

views 18

बांग्लादेशातल्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा आजपासून संप

निवृत्तीनंतरचे विशेष लाभ मिळावेत आणि  अन्य काही मागण्या करत  बांग्लादेशातले रेल्वे कर्मचाऱ्यांनी आजपासून संप पुकारला. याचा मोठा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, ट्रेन चालक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांत झालेली बैठक निष्फळ ठरली.  देशातील रेल्वे वाहतूक बंद पडल्यानं नागरिकांना मोठा त्रास होत आहे. नागरिकांचा त्रास कमी व्हावा यासाठी बांग्लादेश रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशननं विशेष बस सेवा सुरू केल्या आहेत.

January 26, 2025 8:24 PM

views 29

बांगलादेशातले सर्व सहाय्यता कार्यक्रम थांबवण्याचा USAID चा निर्णय

युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट- यूएसएड या संस्थेनं बांगलादेशात सुरू असलेले सर्व सहाय्यता कार्यक्रम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थेच्या अंतर्गत बांगलादेशात होत असलेलं सर्व प्रकारचं काम तातडीनं थांबवण्याच्या सूचना यूएसएडनं काल सर्व सहकारी संस्थांना दिल्या. तत्पूर्वी, आपातकालीन परिस्थितीत अन्नपुरवठा वगळता बांगलादेशाला परदेशातून येणारी सर्व मदत, तसंच इस्रायल आणि इजिप्तला मिळणारी लष्करी मदत अमेरिकेनं शुक्रवारी बंद केली होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या परदेश धो...

January 20, 2025 1:51 PM

views 16

बांगलादेश : इस्कॉनचे माजी पुजारी चिन्मय कृष्ण दास यांच्या जामीनावर सुनावणीची शक्यता

बांगलादेशच्या चिट्टॅगाँग इथल्या सत्र न्यायालयानं या महिन्याच्या २ तारखेला इस्कॉनचे माजी पुजारी चिन्मय कृष्ण दास यांची याचिका फेटाळल्यानंतर बांग्लादेश उच्च न्यायालय आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्याची शक्यता आहे. २५ नोव्हेंबर रोजी हिंदू समाजाच्या वतीनं चिट्टॅगाँग इथं काढलेल्या मोर्चानंतर हिंसा झाली होती. त्यानंतर चिन्मय कृष्ण दास यांना ढाका विमानतळावरून देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. २६ नोव्हेंबरपासून ते तुरुंगात आहेत.

January 19, 2025 6:45 PM

views 25

ठाण्यात बांगलादेशी नागरिकाला अटक

ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी शहरात पोलिसांनी एका बांगलादेशी नागरिकाला अटक केली आहे. शांतिनगर पोलीस या बांगलादेशी नागरिकाची सखोल चौकशी करत आहेत. त्याच्याकडची सर्व कागदपत्रं बनावट असल्याचं आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.