January 9, 2025 1:07 PM

views 21

बांगलादेशात रुग्णवाहिकेतल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने 4 जण ठार

बांगलादेशात ढाका-अरिचा महामार्गावर सावर इथे आज रुग्णवाहिकेतल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने चार जण ठार तर १५ जण जखमी झाले. या रुग्णवाहिकेला बसची धडक बसल्याने हा स्फोट झाला आणि दोन्ही वाहनांना आग लागली.   स्थानिक अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

January 8, 2025 1:24 PM

views 26

माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्यासह ९७ जणांची पारपत्रं बांग्लादेश सरकारकडून रद्द

बांगलादेशाच्या इमिग्रेशन आणि पारपत्र विभागाने बेपत्ता झालेल्या आणि गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या हत्याकांडात कथित सहभागामुळे माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्यासह ९७ जणांची पारपत्रं रद्द केली आहेत. बांगलादेश सरकारच्या मुख्य सल्लागारांचे उपसचिव अब्दुल कलाम आझाद यांनी ही माहिती वार्ताहर परिषदेत दिली आहे.   यापैकी २२ जणांची पारपत्र बांगलादेशाहून स्वतःहून बेपत्ता झाल्यामुळे तर ७५ जणांची पारपत्र जुलैमध्ये झालेल्या हत्याकांडात सहभागी झाल्यामुळे रद्द झाल्याची माहिती त्यांनी दिली. शेख हसीना य...

January 5, 2025 1:11 PM

views 27

भारत आणि बांगलादेश ताब्यात असलेल्या एकमेकांच्या मच्छीमारांची सुटका करणार

भारत आणि बांगलादेश आज त्यांच्या ताब्यात असलेल्या एकमेकांच्या  मच्छीमारांची  सुटका करणार आहेत. बांगलादेशच्या ताब्यात असलेले  ९५ भारतीय मच्छीमार मायदेशी परतणार असून, भारत ९० बांगलादेशी मच्छिमारांना सोडणार आहे. याशिवाय काही नौका देखील परत केल्या जाणार आहेत. भारतीय मच्छीमार दोन महिन्यांहून अधिक काळ बांगलादेशातल्या  तुरुंगात होते.

December 31, 2024 1:12 PM

views 45

कौसर या बांग्लादेशी दहशतवाद्याला सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

बंगळुरूच्या विशेष न्यायालयानं, जहिदुल इस्लाम उर्फ कौसर या बांग्लादेशी दहशतवाद्याला सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. त्याला कट रचणे, लुटणे आणि दारूगोळा खरेदी या गुन्ह्यांमध्ये 57 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. बांग्लादेशात साखळी स्फोट घडवून आणल्यानंतर या आरोपीनं भारतात घुसखोरी केल्याचं तपासात उघड झालं. 2018 मध्ये बोधगयातला बॉम्बस्फोट आणि 2014 मधल्या बरद्वान बॉम्बस्फोट प्रकरणात त्याचा हात असल्याचं तसंच भारत आणि बांग्लादेशात जमात उल मुजाहिदीन यांच्याशी निगडीत कारवायांना प्रोत्साहन ...

December 29, 2024 4:04 PM

views 18

नांदेडमध्ये कौठा भागात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या एका बांगलादेशी नागरिकाला अटक

नांदेडमध्ये कौठा भागात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या एका बांगलादेशी नागरिकाला दहशतवाद विरोधी पथकाने काल अटक केली.आपली ओळख लपवून हा इसम बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. त्याच्या विरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यासोबतच्या दोघांना हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूरजवळ अटक करण्यात आली.

December 18, 2024 6:18 PM

views 24

बांगलादेशात झालेल्या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

बांगलादेशात टोंगी गाझीपूर इथं दोन समाजगटांमधे झालेल्या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झाला तर १०० हून अधिक जण जखमी झाले. बिस्वा इज्तेमा या धार्मिक कार्यक्रमासाठी मैदान ताब्यात घेण्यावरुन तबलिगी जमात या संघटनेच्या आणि भारतीय धर्मगुरु मौलाना साद कंधलवी यांच्या कार्यकर्त्यांमधे हा झगडा झाला. पोलिसांनी जखमींना विविध रुग्णालयांमधे दाखल केलं आहे. परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून परिस्थिती तणावपूर्ण आहे.  या आधी गेल्या ५ नोव्हेंबरला तबलिगी जमात च्या मौलाना झुबैर अहमद गटाने साद कंधलवी यांच्या ब...

December 17, 2024 8:45 PM

views 22

बांगलादेशात संसदीय निवडणूक घेण्याची परवानगी निष्पक्ष काळजीवाहू सरकारला देणारी तरतूद पुनर्स्थापित

बांगलादेशात संसदीय निवडणूक घेण्याची परवानगी निष्पक्ष काळजीवाहू सरकारला देणारी तरतूद तिथल्या उच्च न्यायालयाने पुनर्स्थापित केली आहे.  बांगला देशच्या संविधानातली ही तरतूद १५व्या घटनादुरुस्तीनुसार हटवण्यात आली होती. ही घटनादुरुस्ती संविधानाच्या मूलभूत तत्वांशी फारकत घेऊन लोकशाहीशी तडजोड करणारी होती असं न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती फरहा महबूब आणि न्यायमूर्ती देबाशीष रॉय चौधुरी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. बांगला देशात मुक्त आणि निःपक्षपाती निवडणुकीसाठी काळजीवाहू सरकारची नेमणूक केली जाते....

December 13, 2024 3:29 PM

views 32

बांग्लादेशात अल्पसंख्याकांच्या अत्याचाराविषयी प्रधानमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी – उद्धव ठाकरे

बांग्लादेशात अल्पसंख्याक समाजावर होत असलेल्या अत्याचाराविषयी  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई इथं झालेल्या एका पत्रकार परिषदेत केली. या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी प्रधानमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती, पण त्याबाबत होकार न मिळाल्यामुळं हा विषय पत्रकार परिषदेत मांडला असल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

December 10, 2024 7:28 PM

views 17

बांगलादेशात अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदू समुदायावर अत्याचारांच्या घटनांच्या निषेधार्थ विविध ठिकाणी आंदोलन

बांगलादेशात अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदू समुदायावर अत्याचारांच्या घटनांचा निषेध करण्यासाठी आज राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. बांगलादेश सरकारने अत्याचाराविरोधात कठोर पावलं उचलावीत आणि हिंदू धर्मगुरूंची सुटका करावी, असा आग्रह भारत सरकारने करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नाशिकमध्ये विविध संघटनांनी काढलेल्या मोर्चात मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. धुळे शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. सोलापुरात अनेक हिंदुत्त्ववादी संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढला. यावे...

December 8, 2024 8:23 PM

views 17

बांगलादेशाच्या भारताबरोबरच्या व्यापारात आलेल्या मंदीवर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता

बांगलादेशाच्या भारताबरोबरच्या व्यापारात आलेल्या मंदीवर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता असल्याचं बांगलादेशाचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहीद हुसेन यांनी म्हटलं आहे. अशी  बातमी  स्थानिक वृत्त संस्थेनं दिली आहे. व्यापार मंदीची समस्या सौहार्दपुर्णतेनं सोडवली जाईल , असंही हुसेन यांनी सांगितलं. दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापारात गेल्या २-३ महिन्यात बरीच घाट झाली आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रि  उद्या बांगलादेशात येणार असून त्यांच्याबरोबर द्विपक्षीय व्यापार आणि परस्पर चिंतेच्या विषयांवर...