July 4, 2025 2:48 PM July 4, 2025 2:48 PM

views 25

कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतने पुरुष एकेरीत चीनच्या तैपैच्या वांग पो-वेईवर मिळवला विजय

कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतने पुरुष एकेरीत चीनच्या तैपैच्या वांग पो-वेईवर विजय मिळवला. त्याचा सामना उद्या तैवानच्या तियेन-चेन बरोबर होणार आहे. शंकर सुभ्रमण्यमनं तैवानच्या ह्वांग यु-काईचा पराभव करून अंतिम आठमध्ये प्रवेश केला आहे. महिला एकेरीत श्रियांशी वलिशेट्टी चा सामना आज संध्याकाळी डेन्मार्कच्या अमलिये शुल्झ सोबत होणार आहे.

June 5, 2025 2:51 PM June 5, 2025 2:51 PM

views 42

इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपउपांत्य फेरीत पी.व्ही.सिंधूचा पराभव

इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज झालेल्या उपउपांत्य फेरीत भारताच्या पी.व्ही.सिंधूचा थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगकडून पराभव झाला. पहिल्या फेरीत २२-२० गुणांनी सिंधू आघाडीवर होती, त्यानंतर दुसऱ्या फेरीत २१-१० आणि तिसऱ्या फेरीत २१-१८ अशी आघाडी घेत चोचुवोंगने या फेरीत विजय मिळवला. तसंच आज महिला दुहेरीत ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा मयू मात्सुमोतो आणि युकी फुकुशिया या जापानी जोडीशी सामना होईल. तर पुरूष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डी या जोडीचा सामना रासमुस केजर आण...

May 29, 2025 7:48 PM May 29, 2025 7:48 PM

views 40

सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडी पुरुष दुहेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत दाखल

सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या जोडीनं आज उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी इंडोनेशियाच्या साबर कार्यमान गुटामा आणि मोह रेझा पेहलवी इस्फहानी या जोडीचा १९-२१, २१-१६, २१-१९ असा पराभव केला.   पुढच्या फेरीत मलेशियाच्या बॅडमिंटनपटूंशी त्यांची गाठ पडेल. उपउपान्त्यपूर्व फेरीत पुरुष एकेरीत एच एस प्रणॉयला तर महिला एकेरीत पी व्ही सिंधूला पराभव पत्करावा लागला.

May 29, 2025 1:14 PM May 29, 2025 1:14 PM

views 12

Badminton : पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीचा उपांत्यपूर्व र्फेरीत प्रवेश

सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी इंडोनेशियाच्या साबर कार्यमान गुटामा आणि मोह रेझा पेहलवी इस्फहानी या जोडीचा १९-२१, २१-१६, २१-१९ असा पराभव केला. पुढच्या फेरीत मलेशियाच्या बॅडमिंटनपटूंशी त्यांची गाठ पडेल. उपउपान्त्यपूर्व फेरीत पुरुष एकेरीत एच एस प्रणॉयला तर महिला एकेरीत पी व्ही सिंधूला पराभव पत्करावा लागला. 

May 24, 2025 7:45 PM May 24, 2025 7:45 PM

views 6

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत किदम्बी श्रीकांतचा अंतिम फेरीत प्रवेश

क्वालालंपूर इथं सुरु असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताच्या किदम्बी श्रीकांतनं आज अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं उपांत्य फेरीत जपानच्या युशी तनाका याचा २१-१८, २४-२२ असा पराभव केला. या विजयाने श्रीकांत यावर्षी बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला आहे. अंतिम फेरीत श्रीकांतचा सामना उद्या चीनच्या ली शि फेंग याच्याशी होणार आहे.

May 23, 2025 2:41 PM May 23, 2025 2:41 PM

views 22

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत आज भारत आणि फ्रान्समध्ये सामना

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत आणि फ्रान्सचा टोमा ज्युनिअर पोपोव यांच्यात आज पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल.   श्रीकांतने काल उपउपांत्यपूर्व फेरीत आयर्लंडच्या एन्हात एनगुयेनचा २३-२१, २१-१७ असा पराभव करत अंतिम आठमध्ये प्रवेश केला होता. भारताची मिश्र दुहेरीतील जोडी तनिषा आणि ध्रुव यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

May 14, 2025 3:59 PM May 14, 2025 3:59 PM

views 13

बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू आकर्षि कश्यप आणि उन्नती हुडा उप उपांत्यपूर्व फेरीत

थायलंड इथे सुरु असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू आकर्षि कश्यप आणि उन्नती हुडा आज सकाळी उप उपांत्यपूर्व फेरीत पोहोचल्या. आकर्षि कश्यप हिने महिलांच्या एकेरी स्पर्धेत जपानच्या कावरु सुगियामा हिला नमवलं तर उन्नती हुडा हिने थायलंडच्या तामोनवान निथीटीकाराय हिला हरवलं. पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष सेन ला पराभवाला सामोरं जावं लागलं.महिला दुहेरीत आज भारताच्या गायत्री गोपीचंद आणि ट्रेसा  जॉली यांचा सामना मलेशियाच्या कार्मेन  टिंग आणि ओंगक्षींयि यांच्याशी होईल.

May 9, 2025 2:57 PM May 9, 2025 2:57 PM

views 11

Badminton : पुरुष आणि महिला एकेरीत भारताच्या आयुष  शेट्टी आणि उन्नती हुड्डा यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष आणि महिला एकेरीत भारताच्या आयुष  शेट्टी आणि उन्नती हुड्डा यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. आयुषने भारताच्याच किदंबी श्रीकांत याचा दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत आयुषचा सामना कॅनडाच्या ब्रियन यांग याच्याशी आज होणार आहे.    उन्नती हुड्डाने चायनीज तैपेईच्या लीन सीह युन हिला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या फेरीत तिचा सामना चायनीज तैपेईच्या हुंग यी तिंग हिच्याशी होणार आहे.  

May 8, 2025 3:01 PM May 8, 2025 3:01 PM

views 15

बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकुच

तैपैयी इथं सुरु असलेल्या खुल्या सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकुच सुरु आहे. पुरुषांच्या एकेरीत किदंबी श्रीकांत भारतीय खेळाडू शंकर सुब्रमण्यम याचा पराभव करत दुसऱ्या फेरीत पोहोचला आहे.  महिलांच्या एकेरीत उन्नती हुडानं अनुपमा उपाध्यायचा पराभव करत दुसरी फेरी गाठली आहे.

May 2, 2025 11:36 AM May 2, 2025 11:36 AM

views 12

सुदीरमन करंडक बँडमिंटन स्पर्धेत भारताची इंग्लंडवर ३-२ नं मात

चीनमध्ये सुरू असलेल्या सुदीरमन करंडक बँडमिंटन स्पर्धेत भारतानं इंग्लंडवर ३-२ अशी मात केली. भारताच्या अनुपमा उपाध्यायनं महिला एकेरीत इंग्लंडच्या खेळाडूला पराभूत केलं तर पुरूषांच्या एकेरीत सतीश कुमार करुणाकरण यानंही इंग्लंडच्या खेळाडूला पराभूत केलं. मात्र डेन्मार्क आणि इंडोनेशिया विरूद्धचे सामने हरल्यानं भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यात अपयश आलं.