October 14, 2024 7:17 PM October 14, 2024 7:17 PM

views 10

विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडी म्हणूनच निवडणूक लढवणार – नाना पटोले

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत काँग्रेसची बैठक झाली. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीबद्दल या बैठकीत चर्चा झाली असून महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीनंतर सांगितलं.

October 11, 2024 7:28 PM October 11, 2024 7:28 PM

views 14

विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीत रिपब्लिकन पक्षाची ८ ते १० जागांची मागणी

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा अजून सुरू असून रिपब्लिकन पक्षाला ८ ते १० जागांची मागणी करणार आहोत, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नागपूर इथे वार्ताहर परिषदेत दिली. या सर्व जागा रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावरच लढू असंही त्यांनी स्पष्ट केलं. यामध्ये उत्तर नागपूर आणि यवतमाळमधली उमरखेड विधानसभा मतदारसंघाची जागा मागणार असल्याची माहितीही आठवले यांनी दिली.

October 9, 2024 3:25 PM October 9, 2024 3:25 PM

views 15

महायुतीची बुथस्तरावरील समन्वयासाठी विधानसभा समन्वयकांची नियुक्ती

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीने बुथस्तरावरील समन्वयासाठी राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांसाठी विधानसभा समन्वयकांची नियुक्ती केली आहे. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत या समन्वयकांच्या नावांची घोषणा करण्यात आली.   विधानसभा निवडणुकांचं जागावाटप आणि उमेदवारीबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना देण्यात आले आहेत, असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. महायुती सरकारने मोफत सिलेंडर योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, विविध सिंचन योजना, महिलांसाठी मोफत उच्चशिक्षण, मोफ...

September 25, 2024 2:38 PM September 25, 2024 2:38 PM

views 19

१५ देशांमधल्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळ काश्मीरला भेट

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीची पाहणी करण्यासाठी १५ देशांमधल्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळ आज काश्मीरला भेट दिली. यात अमेरिका, मेक्सिको, गयाना, दक्षिण कोरिया, सोमालिया, पनामा, सिंगापूर, नायजेरिया, स्पेन, दक्षिण आफ्रिका, नॉर्वे, टांझानिया, रवांडा, अल्जेरिया आणि फिलिपाईन्स या देशातल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

September 22, 2024 7:22 PM September 22, 2024 7:22 PM

views 26

महायुतीत रिपब्लिकन पक्षाला बारा जागा देण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला बारा जागा देण्याची मागणी पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. महायुतीतल्या तीन प्रमुख पक्षांनी प्रत्येकी चार जागा रिपाईला द्याव्यात, असं ते म्हणाले.   विदर्भातल्या उत्तर नागपूर, उमरेड, उमरखेड, वाशिम या मतदारसंघांसाठी आठवले आग्रही आहेत. राज्यात लढवणार असलेल्या एकूण जागांची यादी दोन दिवसांत आपण महायुतीला देऊ, या सर्व जागा आमच्याच चिन्हावर लढवू, असंही आठवले यांनी स्पष्ट केलं.

September 12, 2024 8:06 PM September 12, 2024 8:06 PM

views 12

जम्मू-काश्मीर आणि हरियाणात विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

जम्मू आणि काश्मीरमध्ये आगामी विधानसभा निवडणुकां तीन टप्प्यांमध्ये होणार असून तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. तर हरियाणात ९० जागांसाठी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचाही आज शेवटचा दिवस होता. हरियाणात येत्या ५ ऑक्टोबरला मतदान होणार असून मतमोजणी ८ ऑक्टोबर रोजी होईल. तर जम्मू काश्मीरमध्ये ९० जागांसाठी ३ टप्प्यांमध्ये मतदान होणार असून ४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर केला जाईल.  दरम्यान, हरियाणा मंत्रिमंडळाच्या प्रस्तावानंतर राज्यपाल बंडारू दत्तात्...

September 8, 2024 2:19 PM September 8, 2024 2:19 PM

views 18

जम्मू काश्मीरमधे विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराला वेग

जम्मू काश्मीरमधे विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी मागं घेण्याची मुदत संपली असून आता प्रचाराला वेग येत आहे. भारतीय जनता पार्टीनं प्रचाराला जोमदार सुरुवात केली आहे. पक्षाचे स्टार प्रचारक संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज रामबन आणि बनिहालमधे प्रचारसभा घेत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल जम्मूच्या पालोरा भागात सभा घेतली. काँग्रेस नेता राहुल गांधी यांनीही जम्मू काश्मीरला भेट दिली. या आठवड्यात प्रधआनमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, नितीन गडकरी, पक्षाध्यक्ष...

August 21, 2024 12:48 PM August 21, 2024 12:48 PM

views 19

काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात

काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी केंद्र सरकारने निमलष्करी दलाच्या जवळपास तीनशे तुकड्या तैनात केल्या आहेत.  यात सीआरपीएफ, बीएसएफ, एसएसबी आणि आयटीबीपी या निमलष्करी दलांचा समावेश आहे. श्रीनगर, हुंदवडा, गंदेरबाल, बडगाम, कुपवाडा, बारामुल्ला, बांदीपोरा, अनंतनाग, शोपियां, पुलवामा, अवंतीपोरा, आणि कुलगाम जिल्ह्यात निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.    तीन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीची पहिली अधिसूचना काल जाहीर करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यातलं मतदान १८...