November 1, 2024 3:20 PM November 1, 2024 3:20 PM

views 12

राज्यात शंभरी पार केलेल्या मतदारांची संख्या ४७ हजाराच्या वर

  राज्यात येत्या २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल. यामध्ये १८ ते १९ वयोगटातले एकूण २२ लाख २२ हजार ७०४, तर वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेले ४७ हजार ३९२ मतदार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली.   राज्यातल्या एकूण मतदारांमध्ये ५ कोटी २२ हजार ७३९ पुरुष, ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला, तर ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार आहेत.राज्यात मतदानासाठी एकूण १ लाख १८६ मतदान केंद्रं उभारली जाणार आहेत. यापैकी शहरी भागात ४...

October 21, 2024 2:56 PM October 21, 2024 2:56 PM

views 20

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभेसाठी जागावाटपाबाबत चर्चांना वेग

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या बैठका होत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडीमधे घटक पक्षांच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत.

October 21, 2024 8:58 AM October 21, 2024 8:58 AM

views 21

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या अनेक नेत्यांचं पक्षांतर

विधानसभा निवडणुकीच्या जागांसाठी रस्सीखेच सुरू असताना, पक्षबदलाचे वारेही जोरदार वाहात आहेत. माजी आमदार कपिल पाटील यांनी काल दिल्लीत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वाशिम जिल्ह्यातले वंचित बहुजन आघाडीचे माजी पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी काल मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.   दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी काल कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष...

October 19, 2024 7:52 PM October 19, 2024 7:52 PM

views 15

महायुती आणि मविआचं जागावाटप येत्या एक-दोन दिवसांत जाहीर होणार

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी च्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. महायुतीमध्ये केवळ ३०-३५ जागांवर सहमती व्हायची आहे. एक-दोन दिवसात हे जागा वाटप जाहीर होईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नवी दिल्लीत ते आज वार्ताहरांशी बोलत होते. भाजपाच्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली. अंतिम झालेल्या जागांवरचे उमेदवार महायुतीतले पक्ष लवकरच जाहीर करतील, असंही ते म्हणाले.  राज्यातल्या २८८ जागांपैकी भाजपाला दीडशे, शिवसेन...

October 18, 2024 9:04 PM October 18, 2024 9:04 PM

views 11

मतदार याद्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत श्वेतपत्रिका काढण्याची महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या गैरप्रकारांची दखल निवडणूक आयोगानं घ्यावी आणि मतदार याद्यांमधल्या अनियमिततेबद्दल श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेतली आणि त्यांना यासंदर्भात निवेदन दिलं. तसंच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगालाही या संदर्भात पत्र लिहिलं आहे. पराभवाची भीती वाटत असल्यानं महाविकास आघाडीच्या...

October 18, 2024 12:39 PM October 18, 2024 12:39 PM

views 11

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात ४० बोगस मतदारांवर प्रशासनाची कारवाई

धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात ४० बोगस मतदार आढळले असून,त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमाअंतर्गत नोंदणी करतांना, हे बोगस मतदार निदर्शनास आले.दरम्यान,या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात परवा २० ऑक्टोबर रोजी मतदार यादी चावडी वाचन होणार असून, यासाठी गावातल्या सर्व नागरिकांनी उपस्थित राहून, मतदार नोंदणी संदर्भात काही आक्षेप असल्यास नोंदवावेत असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं आहे.

October 18, 2024 10:52 AM October 18, 2024 10:52 AM

views 14

विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीच्या बैठकीत १५० जागांवर एकमत

विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीच्या बैठकीत सुमारे दीडशे मतदार संघांवर एकमत झालं आहे. अर्ज भरायला सुरुवात केल्यावर याची विस्तृत माहिती दिली जाईल, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी काल दिली.   या बैठकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, महाराष्ट्र राज्य समितीचे शंकर अण्णा धोंडगे, भारतीय जवान किसान पक्षाचे नारायण अंकुशे आणि इतर अनेक समविचारी नेते एकत्रित आले होते. आमच...

October 17, 2024 6:57 PM October 17, 2024 6:57 PM

views 9

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर राज्यातल्या सर्व जिल्ह्यात निवडणूकपूर्व तयारीला सुरुवात झाली आहे.    रत्नागिरी जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपास नाके उभारण्यात आले असून सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची १२० जवानांची तुकडी जिल्ह्यात तैनात करण्यात येणार आहे. तसंच सर्व मतदार केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करू...

October 17, 2024 8:48 AM October 17, 2024 8:48 AM

views 13

पक्ष किंवा उमेदवारांकडून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंवर लक्ष ठेवणार असल्याचा निवडणूक आयोगाचा इशारा

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या काळात राजकीय पक्ष किंवा उमेदवारांकडून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंवर निवडणूक आयोगाचं बारीक लक्ष असणार आहे. सर्वसामान्य नागरिक आपल्या तक्रारी C-VIGIL ऍपवर नोंदवू शकतात, अशी माहिती अतिरीक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली.     आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यात जर काही शासन आदेश जारी झाले असतील किंवा जाहिराती प्रसिद्ध झाल्या असतील तर त्याचीही चौकशी केली जाईल,असं कुलकर्णी यांनी संगीतलं.निवडणुकीत उ...

October 16, 2024 3:12 PM October 16, 2024 3:12 PM

views 8

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व जिल्ह्यात निवडणूकपूर्व तयारीला सुरुवात

  राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने काल जाहीर केला. त्यानुसार राज्यातल्या सर्व जिल्ह्यात निवडणूकपूर्व तयारीला सुरुवात झाली आहे.        वाशिम जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी काल वार्ताहर परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यावेळी निवडणुकीच्या तयारीविषयी माहिती देण्यात आली. आचारसंहिता सुरू झाल्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी जाहिरात फलक हटवावेत तसंच नियमांचं काटोकोर पालन करावं  असे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले.        अकोला जिल्ह्यात निवडणूक मुक्त वातावरणात व्हावी ...