November 15, 2024 10:53 AM November 15, 2024 10:53 AM
16
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठीकठिकाणी मतदान जनजागृती अभियान
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठीकठिकाणी मतदान जनजागृती अभियानही राबवलं जात आहे. धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीनं काल ‘वॉक फॉर व्होट’ या प्रभात फेरीचं आयोजन केलं होतं. शहरातल्या सर्व शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी यात मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. तुळजापूर इथं विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून मतदान जनजागृती केली. हिंगोली जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी दुचाकी फेरी काढण्यात आली. परभणी शहरात काल ‘रन फॉर वोट’ ही फेरी काढण्यात आली. महाबळेश्वर तालुक्यात मतदान जनजागृती रथाच्या माध्यमातून नाग...