May 4, 2025 1:29 PM May 4, 2025 1:29 PM

views 5

युरोपशी भागीदारी करण्यात भारताला रस – परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर

युरोपशी भागीदारी करण्यात भारताला रस असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. आर्क्टिक प्रदेशातल्या घडामोडी, जागतिक राजकारण, व्यापार आणि शाश्वततेत आशिया खंडाची वाढती भूमिका लक्षात घेऊन त्यावर साधक-बाधक चर्चा करण्याकरता नवी दिल्लीत आयोजित ‘आर्क्टिक सर्कल इंडिया फोरम २०२५’मध्ये ते आज बोलत होते.   युरोपवर बदलाचा दबाव आहे आणि या बदलांमुळे बहुध्रुवीयतेचं वातावरण तयार होत आहे. केवळ जगाला शिकवणूक देऊन स्वत:च्या घरी मात्र, त्या बाबी आचरणात न आणणारे बरेच असले, तरी, भारताला अशांची नाह...