June 9, 2025 2:56 PM June 9, 2025 2:56 PM

views 12

खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ अंतिम टप्प्यात

काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेला गेलेल्या शिष्टमंडळानं काल अंतिम टप्प्यात वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि उप परराष्ट्रमंत्री क्रिस्टोफर लँडौ यांच्यासह विविध राजकीय नेत्यांची भेट घेतली आणि सीमापार दहशतवादाबद्दल भारताच्या भूमिकेविषयी माहिती दिली. हे शिष्टमंडळ ३ जून रोजी अमेरिकेत पोहोचलं आणि तीन दिवसांच्या कालावधीत त्यांनी कॅपिटल हिल तसंच वॉशिंग्टनमध्ये विविध बैठका घेऊन, अमेरिकेतले संसदसदस्य, सरकारी अधिकारी यांना माहिती दिली. या शिष्टमंडळानं गयाना, पनाम...

June 6, 2025 3:51 PM June 6, 2025 3:51 PM

views 12

खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ जर्मनीत पोहोचलं

ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने दहशतवादाविरोधातील भूमिका जगासमोर मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळं विविध देशांना पाठवले होती. त्यापैकी खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ जर्मनीत पोहोचलं आहे. ७ जूनपर्यंत हे शिष्टमंडळ जर्मन संसद सदस्य आणि जर्मनीच्या संघीय परराष्ट्र कार्यालयातील वरिष्ठ मान्यवरांशी चर्चा करेल. शिष्टमंडळ जर्मनीतील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि भारतीय समुदायाच्या प्रमुख प्रतिनिधींशी संवाद साधणार आहे.

June 5, 2025 2:43 PM June 5, 2025 2:43 PM

views 13

दहशतवादाविरुद्ध भारताचं धोरण स्पष्ट करण्यासाठी गेलेल्या ५ शिष्टमंडळांचा दौरा पूर्ण

भारताने दहशतवादाविरोधात घेतलेली भूमिकेबद्दल जगाला  सांगण्यासाठी गेलेल्या सात शिष्टमंडळांपैकी पाचवं शिष्टमंडळ आज भारतात परतलं आहे. काल यापैकी चार शिष्टमंडळं देशात परतली. संयुक्त जनता दलाचे खासदार संजय झा तसंच द्रमुक खासदार कन्निमोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळांनी आज परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली.    काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाने अमेरिकेतले अग्रणी, तसंच वरिष्ठ अधिकारी आणि भारतीय समुदायाबरोबर घेतलेल्या बैठकांमध्ये भारताने दहशतवादाविरोधा...

June 4, 2025 1:33 PM June 4, 2025 1:33 PM

views 18

दहशतवादाविरुद्ध भारताचं धोरण स्पष्ट करण्यासाठी गेलेल्या ४ शिष्टमंडळांचा दौरा पूर्ण

दहशतवादाविरुद्ध भारताच्या शून्य सहिष्णुतेचं धोरण स्पष्ट करण्यासाठी जगभरातल्या विविध देशांना भेट देण्यासाठी गेलेल्या सात बहुपक्षीय शिष्टमंडळांपैकी ४ शिष्टमंडळं भारतात परतली आहेत. या दौऱ्यात शिष्टमंडळांनी विविध परदेशी नेते, वरिष्ठ अधिकारी, प्रभावशाली विचारवंत, माध्यमं आणि भारतीय समुदायांशी संवाद साधला.   शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ आज सकाळी यूएई, लायबेरिया, काँगो आणि सिएरा लिओनला भेट देऊन भारतात परतलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्र...

June 4, 2025 11:04 AM June 4, 2025 11:04 AM

views 18

बहुपक्षीय शिष्टमंडळं मायदेशी रवाना

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी जगातल्या विविध देशांना भेट देण्यासाठी रवाना झालेली बहुपक्षीय शिष्टमंडळं मायदेशी परतत आहेत. अल्जेरिया, सौदी अरेबिया, कुवेत आणि बहरीन या देशांना भेट देऊन परतलेल्या भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं काल नवी दिल्ली इथं परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांची भेट घेतली आणि आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना सादर केल्या. या उपक्रमातून सरकारची सर्व उद्दिष्टं साध्य झाल्याचं जयशंकर म्हणाले आणि त्यांनी या शिष्टमंडळाचं अभिनंदन केलं, अशी म...

June 3, 2025 12:52 PM June 3, 2025 12:52 PM

views 13

बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळाच्या वेगवेगळ्या देशांना भेटी

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी  बहुपक्षीय शिष्टमंडळं जगभरातल्या  विविध देशांना भेट देत आहेत. त्या देशांचे उच्चपदस्थ अधिकारी, प्रभावशाली व्यक्ती, माध्यम प्रतिनिधी आणि तिथल्या भारतीय समुदायाशी ते संवाद साधत आहेत.   भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ अल्जेरिया, सौदी अरेबिया, कुवेत आणि बाहरीन इथं भेट देऊन आज सकाळी मायदेशी परतलं.    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्...

June 2, 2025 12:07 PM June 2, 2025 12:07 PM

views 13

सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळाच्या वेगवेगळ्या देशांना भेटी

विविध देशांमध्ये गेलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळांपैकी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ इजिप्तची राजधानी कैरो मध्ये दाखल झालं.   भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालचं  शिष्टमंडळ  फ्रांस, इटली आणि डेन्मार्कचा दौरा आटोपून लंडनला पोहोचलं आहे. याशिवाय भाजप खासदार बैजयंत पांडा यांचं शिष्टमंडळ सध्या अल्जेरियाच्या दौऱ्यावर असून, त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, तर द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालचं श...

June 1, 2025 1:27 PM June 1, 2025 1:27 PM

views 17

सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळाच्या वेगवेगळ्या देशांना भेटी

दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णूतेचा भारताचा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी विविध देशांमध्ये गेलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ इथिओपिया इथं पोहोचली आहेत. या प्रतिनिधिमंडळानं इथिओपिया मधले संसद प्रतिनिधी, मान्यवर व्यक्ती आणि आफ्रिकी संघ आयोगाच्या सदस्यांची भेट घेतली. भारताला नियंत्रण रेषेच्या पलीकडून असलेला दहशतवादाचा धोका आणि देशात सांप्रदायिक सलोखा बिघडवण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांची माहिती त्यांना ...

May 31, 2025 1:06 PM May 31, 2025 1:06 PM

views 23

बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळाच्या वेगवेगळ्या देशांना भेटी

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षिय शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत.    काँग्रेस खासदार शशि थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज कोलंबियाच्या परराष्ट्र व्यवहार उपमंत्री रोझा योलांडा व्हिलाविचेंसिओ यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान पाकिस्तानबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या कोलंबियाच्या विधानावर थरूर यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र भारताच्या भूमिकेला कोलंबियानं पाठिंबा दिला असून हे विधान मागे घेतल्याचं त्यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. ...

May 30, 2025 12:58 PM May 30, 2025 12:58 PM

views 18

सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा सौदी अरेबियातल्या तीन दिवसांच्या राजनैतिक मोहिमेचा समारोप

दहशतवादा विरोधात भारताची भूमिका जगाला पटवून देण्यासाठी गेलेल्या भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने काल सौदी अरेबियातल्या तीन दिवसांच्या राजनैतिक मोहिमेचा समारोप केला. या शिष्टमंडळाचं नेतृत्त्व भाजपा खासदार बैजयंत पांडा यांनी केलं. त्यांच्या सौदी भेटीदरम्यान, भारतीय प्रतिनिधींनी रियाधमधील गल्फ रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. अब्दुलअजीज सागर आणि नायफ अरब युनिव्हर्सिटी फॉर सिक्युरिटी सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. अब्दुलमाजीद अल्बानयान यांची भेट घेतली.