November 26, 2025 7:25 PM November 26, 2025 7:25 PM

views 16

मुंबईची हवा ‘खराब’ श्रेणीत

मुंबईत आज संध्याकाळी हवेचा गुणवत्ता निर्देशांक २२४ इतका नोंदवण्यात आला. हा आकडा अतिशय खराब या श्रेणीत मोडतो. इथियोपियातल्या ज्वालामुखीचा उद्रेक हे यामागचं कारण असू शकतं, शिवाय, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात गुणवत्ता निर्देशांक सामान्यतः घसरलेला असतो.    गेल्या २४ तासात राज्यातल्या काही भागात तपमान घसरलं. येत्या १-२ दिवसात राज्यभरात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे. दक्षिणेकडच्या राज्यात वेगवान वारे वाहण्याची शक्यता असल्यानं रविवारपर्यंत खोल समुद्रात मासेमारी टाळण्याचं आवाहन हवामा...

May 10, 2025 8:50 PM May 10, 2025 8:50 PM

views 8

आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातमीपत्रांच्या वेळेत बदल

आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही बातमीपत्रांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार दुपारी ३ चं प्रादेशिक बातमीपत्र ३ वाजून २० मिनिटांनी, संध्याकाळी पाच वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र ५ वाजून २० मिनिटांनी तर रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र ८ वाजून २० मिनिटांनी प्रसारित होईल.   आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागाचा कार्यक्रम वृत्तविशेष आणि अर्थविशेष संध्याकाळी सव्वासात ऐवजी रात्री साडेआठ वाजता प्रसारित होईल. पुढील आदेश येईपर्यंत हे बदल ...

October 28, 2024 10:34 AM October 28, 2024 10:34 AM

views 5

दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता निकृष्ट श्रेणीत

दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट श्रेणीत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री आठ वाजता दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक 347 इतका नोंदवला गेला. बुधवारपर्यंत हवेची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट श्रेणीतच राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे.

August 16, 2024 8:11 PM August 16, 2024 8:11 PM

views 13

शेतकऱ्यांपर्यंत विज्ञान पोहोचवण्यासाठी आकाशवाणीवर ‘किसानों की बात’ हा कार्यक्रम

शेतकऱ्यांपर्यंत विज्ञान पोहोचवण्यासाठी सरकार आकाशवाणीवर किसानों की बात हा कार्यक्रम सुरू करणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत शेतकऱ्यांशी संवाद साधताना ही माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या मन की बात या  कार्यक्रमासारखा हा  कार्यक्रम असणार आहे. पुढच्या महिन्यापासून हा कार्यक्रम सुरू होईल. यात कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना माहिती देणार असल्याचं,  त्यांनी यावेळी सांगितलं.