February 22, 2025 8:14 PM February 22, 2025 8:14 PM
5
शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आणि जीवनरेखा -शिवराज सिंह चौहान
‘शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आणि जीवनरेखा आहे’, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं आहे. चौहान यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं पुसा-कृषी विज्ञान मेळ्याचं उदघाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. शेतकरी आणि शेतीशिवाय, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणूनच सरकार कृषी क्षेत्रात सातत्यानं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान शिवराज चौहान यांनी हरियाणात गुरुकुल कुरुक्षेत्र इथल्या नैसर्गिक पद्धतीनं केलेल्या शेतीचीही पाहणी केल...