July 1, 2025 3:55 PM

views 17

कृषीमंत्र्यांच्या हस्ते महाकृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण कार्यशाळेचे उद्धाटन

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार असल्याचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. कृषी विभागातर्फे महाकृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण कार्यशाळेचा उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते.   मानव विरहित शेती, ‘ए आय’ आधारित हवामानाचे अंदाज, हवामान अनुकूल पीक पद्धती, काटेकोर सिंचन पद्धतींचा विकास, जिल्हास्तरावर शेती प्रयोगशाळा उभारणे, शेतीसाठी मोबाईल व्हॅन, पीक साठवणूक सुविधा वाढवणे, यावर शासनाचा भर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. आधुनिक तंत्रज्ञानाची ज...

June 3, 2025 8:19 PM

views 27

कीडरोग मुक्त रोपं निर्मितीसाठीच्या ‘क्लिन प्लांट’ कार्यक्रमांतर्गत देशातील ९ पैकी ३ केंद्र महाराष्ट्रात उभारणार असल्याची केंद्रीय कृषिमंत्र्यांची घोषणा

कीडरोग मुक्त रोपं निर्मितीसाठीच्या ‘क्लिन प्लांट’ कार्यक्रमांतर्गत देशातील ९ पैकी ३ केंद्र महाराष्ट्रात उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत पुण्यात आयोजित कृषी हॅकेथॉनच्या समारोप समारंभात ते आज बोलत होते. द्राक्षाचं केंद्र पुणे इथं, संत्र्यासाठी नागपूर आणि डाळींबासाठी सोलापूर इथं केंद्र सुरू करण्यात येणार असून या केंद्रांच्या आधारे राज्याचं फलोत्पादन क्षेत्र जगात आघाडी घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेती क्षेत्रासमोर ...

January 3, 2025 9:59 AM

views 48

शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांचं प्रतिपादन

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीचं उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनानं सर्वोच्च प्राधान्य दिले असून यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल अहिल्यानगर जिल्हयामध्ये केलं. राहाता तालुक्यातल्या बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी परिसंवादात चौहान बोलत होते. शेतकऱ्यांच्या विकासासाठी मंत्रालयानं सुरू केलेल्या विविध योजनांचा आढावा चौहान यांनी घेतला तसंच कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. लखपती दीदी आ...