डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

कीडरोग मुक्त रोपं निर्मितीसाठीच्या ‘क्लिन प्लांट’ कार्यक्रमांतर्गत देशातील ९ पैकी ३ केंद्र महाराष्ट्रात उभारणार असल्याची केंद्रीय कृषिमंत्र्यांची घोषणा

कीडरोग मुक्त रोपं निर्मितीसाठीच्या ‘क्लिन प्लांट’ कार्यक्रमांतर्गत देशातील ९ पैकी ३ केंद्र महाराष्ट्रात उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत पुण्यात आयोजित कृषी हॅकेथॉनच्या समारोप समारंभात ते आज बोलत होते. द्राक्षाचं केंद्र पुणे इथं, संत्र्यासाठी नागपूर आणि डाळींबासाठी सोलापूर इथं केंद्र सुरू करण्यात येणार असून या केंद्रांच्या आधारे राज्याचं फलोत्पादन क्षेत्र जगात आघाडी घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेती क्षेत्रासमोर अनेक समस्या असताना शेतकऱ्याला साहाय्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा एकमात्र उपाय आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असून त्यासाठी कृषी विभागानं पुढाकार घेऊन कृषी महाविद्यालयांमध्ये इन्क्युबेशन केंद्रं तयार करावीत, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. शेतकऱ्यांच्या फायदेशीर शेतीला दिशा देण्याचं कार्य कृषी हॅकॅथॉननं केलं आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले. यापुढील काळात विविध ठिकाणी असे उपक्रम राबवण्यात येतील, असं ते म्हणाले.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा