October 14, 2025 1:16 PM October 14, 2025 1:16 PM
29
जागतिक स्तरावरच्या संघटनांमधे सुधारणा आवश्यक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन
संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेत योगदान देणाऱ्या देशांच्या प्रमुखांच्या संमेलनाला आज नवी दिल्ली इथं सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेचं यजमानपद भारतीय लष्कराकडे आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या संमेलनात बोलताना, कालबाह्य झालेल्या आंतरराष्ट्रीय यंत्रणांमध्ये सुधारणांची गरज असल्याची भारताची भूमिका अधोरेखित केली. काही देश उघडपणे आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करत आहेत, तर काही देशांना या नियमांवर आपलं वर्चस्व ठेवायचं आहे. अशा परिस्थितीत नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था कायम ...