June 20, 2025 8:00 PM June 20, 2025 8:00 PM

views 2

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते बिहारमध्ये ५ हजार ९०० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण

गेल्या ११ वर्षांत बिहारला समृद्धी आणि विकासाच्या मार्गावर नेणारं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार हे विकासाचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. बिहार इथे सिवानमध्ये एका जाहीर सभेला ते संबोधित करत होते. त्यांनी सिवान इथून ५ हजार ९०० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं दूरस्थ पद्धतीने उद्घाटन आणि पायाभरणी केली. यामध्ये विविध नवीन रेल्वे गाड्यांचा शुभारंभ, प्रधानमंत्री घरकूल योजना, नमामी गंगे योजनेअंतर्गत ६ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचं उद्घाटन इत्यादी विकासकामांचा सम...

June 18, 2025 1:51 PM June 18, 2025 1:51 PM

views 12

G7 परिषदेत भाग घेतल्यानंतर प्रधानमंत्री कॅनडाहून क्रोएशियाची राजधानी झाग्रेब साठी रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला कॅनडा दौरा आटोपून आज दुपारी क्रोएशियाची राजधानी झाग्रेब इथे पोहोचतील. या दौऱ्यात धोरणात्मक सहकार्यावर द्विपक्षीय चर्चा होण्याची अपेक्षा आहे. यात शिष्टमंडळ पातळीवरची चर्चा, प्रमुख क्षेत्रांमध्ये करार आणि राजकीय-सांस्कृतिक कूटनीती यांचा समावेश असेल. या दौऱ्या दरम्यान, भारत आणि क्रोएशिया दरम्यान, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी, शिक्षण आणि संस्कृती या क्षेत्रातल्या प्रमुख करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. तसंच, २०३० पर्यंत सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमाच्या विस...

April 9, 2025 1:46 PM April 9, 2025 1:46 PM

views 10

नवकार महामंत्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन, नवी दिल्लीतल्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांचा सहभाग

हवामान बदल हे आजचे सर्वात मोठं संकट असून जैन समुदायानं शतकानुशतके पाळलेली शाश्वत जीवनशैली हाच त्याचा उपाय असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथे नवकार महामंत्र दिवसानिमित्त आयोजित एका सभेला ते संबोधित करत होते. भारताच्या इतिहासात आणि आध्यात्मिक प्रवासात जैन धर्माचं मोठं योगदान असून जैन साहित्य हे भारताच्या बौद्धिक वैभवाचा कणा आहे. नवकार महामंत्र हा जैन धर्मातल्या अहिंसा, नम्रता आणि आध्यात्मिक उन्नतीच्या तत्वांचा मंत्र आहे. महामंत्राचं महत्त्व फक्त आध्यात्मिक ...

April 9, 2025 9:24 AM April 9, 2025 9:24 AM

views 11

प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत नवकार महामंत्र दिवस विशेष कार्यक्रम नवी दिल्लीमध्ये सुरू

आज नवकार महामंत्र दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आज सकाळी आठ वाजता हा कार्यक्रम विज्ञान भवन इथं सुरू झाला आहे. याप्रसंगी प्रधानमंत्री उपस्थितांशी संवादही साधतील. नवकार महामंत्र दिवस हा आध्यात्मिक सुसंवाद आणि नैतिक जाणीवेचा एक महत्त्वपूर्ण उत्सव समजला जातो. “जैन धर्मातील आदरणीय आणि सार्वत्रिक जप असलेला नवकार महामंत्र सामूहिक पठणाद्वारे लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. अहिंसा, नम्रता आणि आध्यात्मिक उन्...

April 9, 2025 9:03 AM April 9, 2025 9:03 AM

views 17

आगामी वेव्ह्ज परिषदेच्या माध्यमातून भारतीय कलाकारांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक कमावण्याची संधी, प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

मनोरंजन उद्योग मोठ्या उद्योगांपैकी एक असून, आगामी काळात याचा मोठा विस्तार होणार असल्याचं प्रतिपादन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. एका खाजगी वृत्तसंस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. सरकारने पुढील महिन्यात मुंबईत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट म्हणजेच वेव्ह्ज परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेमुळे भारतीय कलाकारांना कंटेट तयार करण्यासाठी आणि आपली कला जागतिक पातळीवर पोहचवण्यासाठी उपयोग होणार असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.  

April 5, 2025 2:42 PM April 5, 2025 2:42 PM

views 2

रामनवमी निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या तामिळनाडूला देणार भेट

रामनवमी निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या तामिळनाडूला भेट देणार असून रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणाऱ्या नवीन पांबन रेल्वे पुलाचं उद्घाटन करणार आहेत. आकाशवाणीवरून या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार असल्यानं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र उद्या दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होईल.  

February 11, 2025 3:39 PM February 11, 2025 3:39 PM

views 3

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवणार

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून नवसंशोधन आणि त्याचं नियमन यावर जागतिक पातळीवर चर्चा करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. पॅरिसमध्ये आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेत सहअध्यक्षपदावरुन ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचे चांगले उपयोग खूप आहेत. मात्र त्याचवेळी त्यातून होणाऱ्या दुजाभावावर लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.  फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन या परिषदेत सहअध्यक्ष झाले आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी भारत-फ्रान्स द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्...

February 7, 2025 1:13 PM February 7, 2025 1:13 PM

views 3

कामेश्वर चौपाल यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्र्यांकडून शोक व्यक्त

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. चौपाल हे समर्पित रामभक्त होते, ज्यांनी अयोध्येतल्या राम मंदिराच्या उभारणीत मोलाचं योगदान दिलं. समाजाच्या वंचित घटकाच्या कल्याणासाठी केलेल्या कामामुळे ते सदैव स्मरणात राहतील, असं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.  

February 6, 2025 1:40 PM February 6, 2025 1:40 PM

views 9

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावरील चर्चेला प्रधानमंत्री आज राज्यसभेत उत्तर देणार

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्ताव चर्चेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राज्यसभेत उत्तर देतील. आज संध्याकाळी मोदी सभागृहाला संबोधित करतील, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी दिली. दोन दिवसांपूर्वीच लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलचा आभारप्रस्ताव मंजूर झाला होता.

February 5, 2025 2:29 PM February 5, 2025 2:29 PM

views 19

प्रधानमंत्र्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करण्याचं केलं आवाहन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदिप धनखड, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना, केंद्रीय मंत्री एस. जयशंकर आणि हरदीप सिंह पुरी यांनी मतदानाचा अधिकार बजावला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना, आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनीही मतदान केलं. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार, प्रधानमंत्र्यांचे मुख्य सचिव पी. के. मिश्रा, दिल्ली पोलिस आयुक्त स...