डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत नवकार महामंत्र दिवस विशेष कार्यक्रम नवी दिल्लीमध्ये सुरू

आज नवकार महामंत्र दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आज सकाळी आठ वाजता हा कार्यक्रम विज्ञान भवन इथं सुरू झाला आहे. याप्रसंगी प्रधानमंत्री उपस्थितांशी संवादही साधतील. नवकार महामंत्र दिवस हा आध्यात्मिक सुसंवाद आणि नैतिक जाणीवेचा एक महत्त्वपूर्ण उत्सव समजला जातो. “जैन धर्मातील आदरणीय आणि सार्वत्रिक जप असलेला नवकार महामंत्र सामूहिक पठणाद्वारे लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. अहिंसा, नम्रता आणि आध्यात्मिक उन्नतीच्या तत्त्वांमध्ये रुजलेला हा मंत्र ज्ञानी प्राण्यांच्या सद्गुणांना चालना देत आंतरिक परिवर्तनाला प्रेरणा देतो. हा दिवस सर्व व्यक्तींना आत्मशुद्धी, सहिष्णुता आणि सामूहिक कल्याणाच्या मूल्यांवर चिंतन करण्यास प्रोत्साहित करतो”, असं मोदी यांनी आपल्या प्रसारमाध्यमांवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. शांती आणि एकतेसाठी जागतिक पातळीवर केल्या जाणाऱ्या या जपाच्या पठणामध्ये आज १०८ पेक्षा अधिक देशांतील लोक सामील होणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा