April 15, 2025 11:06 AM April 15, 2025 11:06 AM

views 3

नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत आज अवकाळी पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्रात काल तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडला. मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस झाला. नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत आजही अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, राज्यात आज सर्वात जास्त ४२ पूर्णांक ४ अंश सेल्सिअल तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं ३९ पूर्णांक सहा, तर छत्रपती संभाजीनगर आणि परभणी इथं सरासरी ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  

April 5, 2025 3:31 PM April 5, 2025 3:31 PM

views 11

लातूर – टेम्पोने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू

लातूर शहरात गंजगोलाई भागात एका टेम्पोनं मोटारसायकलला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात आज एका तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी टेम्पोसह ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आहे. तर याच भागात एका जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळून त्याखाली एक रिक्षा आणि दोन दुचाकी अडकल्या. मात्र यात जीवितहानी झाली नाही.

February 5, 2025 10:56 AM February 5, 2025 10:56 AM

views 12

लातूर जिल्ह्यात २० फेब्रुवारी पर्यंत पंचसूत्री विशेष पंधरवड्याचं आयोजन

लातूर जिल्ह्यात २० फेब्रुवारी पर्यंत पंचसूत्री विशेष पंधरवडा राबवला जाणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या आहेत.

February 4, 2025 10:01 AM February 4, 2025 10:01 AM

views 8

लातूर : दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

इयत्ता बारावीच्या परीक्षा ११ फेब्रुवारीपासून तर दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. लातूर जिल्ह्यात या दोन्ही परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा काल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आढावा घेतला. या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.  

January 22, 2025 10:00 AM January 22, 2025 10:00 AM

views 7

लातूर : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धांना सुरुवात

लातूर जिल्ह्यात उदगीर इथं आश्रम शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या दोन दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धेला काल प्रादेशिक उपसंचालक दिलीपकुमार राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. लातूर, धाराशिव, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या आश्रमशाळेतले विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

January 16, 2025 3:32 PM January 16, 2025 3:32 PM

views 1

लातूर जिल्ह्यातील माऊली सोट मृत्यूप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची ओबीसी नेत्यांची मागणी

लातूर जिल्ह्यातील माऊली सोट मृत्यूप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी ओबीसी नेते वाघमारे आणि सोनकटे यांनी केली आहे. लातूर जिल्ह्यातल्या टाकळी इथल्या अठरा वर्षीय तरुण माऊली सोट या तरुणाला प्रेमप्रकरणातून जमावाकडून मारहाण झाली होती. घटनेच्या दोन महिन्यानंतर माऊली सोट या तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत सहा जणांना अटक केली असून, या प्रकरणातील आणखी दोन जणांना तत्काळ अटक करण्याची मागणीही करण्यात आली आहे.  

December 12, 2024 10:58 AM December 12, 2024 10:58 AM

views 5

लातूर जिल्ह्यात आजपासून क्रीडा सप्ताहाचं आयोजन

लातूर जिल्ह्यात आजपासून क्रीडा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. १८ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या सप्ताहाचं आज सकाळी जिल्हा क्रीडा संकुलावर उद्धाटन होईल. या सप्ताहात जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध स्पर्धा होणार आहेत, यामध्ये धावणे, कराटे, तायक्वांदो, कुस्ती, स्केटिंग, लॉन टेनिस, आट्या-पाट्या, रग्बी, सायकलिंग आदी स्पर्धांचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या अधिकाधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केलं आहे.

December 7, 2024 10:26 AM December 7, 2024 10:26 AM

views 2

लातूर येथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते उद्घाटन

लातूर इथं दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांचं काल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. जिल्ह्यातील ५१ शाळांमधील जवळपास ६०० दिव्यांग विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. दिव्यांगत्व प्रकार आणि वयोगटानुसार ९२ विविध गटात या स्पर्धा होणार असल्याचं, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी सांगितलं. उद्घाटनापूर्वी विद्यार्थ्यांनी पथसंचलन केलं, त्यानंतर क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. दरम्यान, लातूर जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचं काल ...

September 27, 2024 11:05 AM September 27, 2024 11:05 AM

views 15

राज्यातल्या विविध धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु

लातूर जिल्ह्यात मांजरा धरणाच्या सहा दरवाजातून तीन हजार ४९४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं तर रेणापूर मध्यम प्रकल्पाचे ४ दरवाजे १० सेंटीमीटरने उघडून, नदीपात्रात एक हजार २५८ घनफुट प्रतिसेकंद विसर्ग सुरू आहे.  लातूर-धाराशिव सीमेवर माकणी इथल्या निम्न तेरणा प्रकल्पाचे आठ दरवाजे काल बंद करण्यात आले, सध्या सहा दरवाजातून दोन हजार २९० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यातील पांझरा नदीवरील अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाचे 7 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून 8 हजार 123 क्यूसेक विसर्ग नदीपात्...

July 1, 2024 8:15 PM July 1, 2024 8:15 PM

views 2

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आता लातूर पोलिसांकडून सीबीआयकडे

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आता लातूर पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. न्यायालयाच्या परवानगीनं लातूर पोलिसांच्या कोठडीत असलेल्या जलील खान पठाण आणि संजय जाधव या आरोपींना आज सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं. या दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी उद्या संपणार आहे, त्यामुळे त्यांना उद्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे.