June 18, 2024 7:30 PM

views 21

लातूर जिल्ह्यात 200 हेक्टरवर होणार ‘मिलेट’ची पेरणी

लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या लोदगा इथं आज जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते भरड धान्य पेरणी करून जिल्ह्यात २०० हेक्टर क्षेत्रावर भरड धान्य पेरणी करण्याचा प्रारंभ झाला. राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या पुढाकारानं जिल्ह्यात भरड धान्य उत्पादन वाढवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवला जात आहे.  भरड धान्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं अध्यक्ष पाशा पटेल यांनी याप्रसंगी सांगितलं.

June 18, 2024 11:23 AM

views 46

बकरी ईदचा सण सर्वत्र भक्तिभावानं साजरा

बकरी ईदचा सण काल सर्वत्र भक्तिभावानं साजरा झाला. पारंपरिक पद्धतीनं नमाज पठणासह इतर कुर्बानी आणि इतर धार्मिक विधी पार पडले. छत्रपती संभाजीनगर इथं महापालिकेनं तीन ठिकाणी केलेल्या तात्पुरत्या कत्तलखान्यात काल म्हैस तसंच बकरीवर्गीय सुमारे शंभर जनावरांची कुर्बानी देण्यात आल्याचं, महापालिकेकडून जारी पत्रकात म्हटलं आहे. लातूर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी बकरी ईद पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. लातूर शहरातल्या ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठण करण्यात आलं. त्यानंतर जगभरात शांततेसाठी सामुहिक प्रार्थना क...