April 17, 2025 10:35 AM

views 32

अंबाजोगाई हे कवितांचं गाव म्हणून ओळखलं जाणार-मराठी भाषा मंत्र्यांची घोषणा

बीड इथं जिल्हा गुंतवणूक परिषद काल घेण्यात आली. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांनी ९०० कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. यातून असंख्य रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. बीड इथं कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, अंबाजोगाई हे कवितांचं गाव म्हणून जाहीर करणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल केली. ऐकूया या संदर्भातला हा विशेष वृत्तांत.. मराठीचे आ...

April 15, 2025 10:51 AM

views 30

बीड – आवादा कंपनीच्या पवनचक्की बांधणीच्या ठिकाणी झालेल्या चोरी प्रकरणी चार जणांच्या टोळीला अटक

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात सुरू असलेल्या आवादा कंपनीच्या पवनचक्की बांधणीच्या ठिकाणी झालेल्या चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल चार जणांच्या टोळीला अटक केली. त्यांच्याकडून ११ लाख ५८ हजार रूपयांचा मुद्देमाल आणि चारचाकी वाहन जप्त करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी दिली.

April 1, 2025 9:46 AM

views 30

बीड : प्रार्थनास्थळात स्फोट घडवून आणल्याप्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक

बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या अर्धमसला इथं प्रार्थनास्थळात स्फोट घडवून आणल्याप्रकरणी विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना विशेष न्यायालयानं ३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, दहशतवाद विरोधी पथक आता या प्रकरणाचा समांतर तपास करणार आहे.

February 11, 2025 9:09 AM

views 27

बीड – वीजपुरवठा सुरळीत करा या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन

बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यात वीजपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी काल आंदोलन केलं. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं शेतातील पिकांना पाणी देणं अवघड होत आहे. वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही आंदोलक शेतकऱ्यांनी दिला.

February 5, 2025 4:30 PM

views 32

राजुरी ते बीड या नवीन लोहमार्गावर आज हायस्पीड रेल्वेची घेण्यात आली चाचणी

बीड जिल्ह्यातल्या राजुरी ते बीड या नवीन लोहमार्गावर आज हायस्पीड रेल्वेची चाचणी घेण्यात आली. हिवरसिंगा, जवळागिरी, बरगवाडी या गावातल्या वाहतुकीसाठी रेल्वे पूल नसल्यामुळे गावात नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडथळा निर्माण होत असल्याचं आमदार संदीप क्षीरसागर यांनी रेल्वे वाहतूक सुरक्षा आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलं.

February 5, 2025 10:51 AM

views 38

बीड : ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखेतल्या ठेवीदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

बीड जिल्ह्यात काल ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखेतल्या ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. ठेवीदारांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारले जावेत, तसंच ठेवीदाराच्या ठेवी लवकरात लवकर परत द्याव्यात, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचं ठेवीदार कृती समितीचे प्रमुख संदीप उबाळे यांनी सांगितलं.

January 7, 2025 10:22 AM

views 32

बीड शहरात काढण्यात आला संविधान बचाव मोर्चा

बीड शहरात काल संविधान बचाव मोर्चा काढण्यात आला. परभणी इथल्या घटनेचा निषेध व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधातही यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असलेल्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या.  

December 5, 2024 9:57 AM

views 42

बीड जिल्हा युवा महोत्सवाला प्रारंभ

बीड जिल्हा युवा महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. जिल्हा क्रीडा संकुलावर भरलेल्या या महोत्सवाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने यांच्या हस्ते झालं. या महोत्सवात विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पनांवरर आधारित स्पर्धा, लोकनृत्य, लोकगीत, कौशल्य विकास कार्यक्रम, कथालेखन, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे.

December 4, 2024 9:17 AM

views 24

जागतिक शौचालय दिनानिमित्त बीड जिल्ह्यात राबवण्यात येणार विशेष मोहीम

जागतिक शौचालय दिनानिमित्ताने बीड जिल्ह्यात १४ नोव्हेंबरपासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. आमचे शौचालय आमचा सन्मान या मोहिमेत जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा, असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी केलं आहे.

October 9, 2024 10:14 AM

views 32

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचा आज बीड तसंच जालना दौरा

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे आज बीड तसंच जालना दौऱ्यावर येत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथून सकाळी दहा वाजेच्या सुमारास ते हेलिकॉप्टरने बीडकडे प्रयाण करतील. दुपारी दोन वाजेपर्यंत विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधून सव्वा दोन वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टरने ते जालन्याकडे प्रयाण करणार आहेत.