January 3, 2026 9:48 AM | Sugar Production

printer

यंदा ३५० लाख टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज

देशात यंदा सुमारे ३५० लाख टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज असून ३१ डिसेंबरअखेर ११८ लाख टन साखर तयार झाली आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक सुमारे ४९ लाख टन आणि त्यानंतर उत्तर प्रदेशात ३५ लाख टन साखर तयार झाली आहे. देशात आतापर्यंत झालेलं साखर उत्पादन समाधानकारक असून यापुढील काळात त्यात आणखी वाढ होईल अशी माहिती राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.