यंदाच्या ऊस गाळप हंगामात ३५० लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज आहे. साखरेचा आरंभीचा शिलकी साठा ५० लाख मेट्रिक टन असून देशांतर्गत साखरेचा खप २९० लाख मेट्रिक टन आहे. तर ३५ लाख मेट्रिक टन साखर इथेनॉल तयार करण्यासाठी वापरली जाईल. तरीसुद्धा ७५ लाख मेट्रिक टन साखर शिल्लक राहण्याचा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यांतर्गत उत्पादनात यंदा महाराष्ट्रात १२५ लाख मेट्रिक टन, उत्तरप्रदेशात ११० लाख मेट्रिक टन आणि कर्नाटकात ७० लाख मेट्रिक टन इतकं सर्वाधिक उत्पादन अपेक्षित आहे.
Site Admin | November 27, 2025 8:25 PM | Sugar Production
यंदा ३५० लाख मेट्रिक टन साखरेच्या उत्पादनाचा अंदाज