राज्यात मार्च अखेरच्या ऊस गाळप हंगामाच्या अहवालानुसार, ८० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झालं आहे. एकूण २०० पैकी १८९ कारखान्यांची धुराडी ऊस संपल्यानं बंद झाली असून, सध्या केवळ ११ साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात २७ पूर्णांक ६८ लाख मेट्रिक टन घट झाल्याचं स्पष्ट झालं आहे. साखरेचं ९२ ते १०४ लाख मेट्रिक टन उत्पादन हाती येण्याची अपेक्षा असल्याचं पुणे साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात आलं आहे.
Site Admin | April 7, 2025 9:07 AM | Sugar Production
राज्यात ८० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन
