June 12, 2025 7:41 PM | Stock Exchange

printer

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे ८२३ अंकांची घसरण

जागतिक बाजारातलं कमजोर वातावरण तसंच इराण आणि अमेरिकेत वाढलेल्या तणावामुळे देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स ८२३ अंकांनी घसरुन ८१ हजार ६९२ अंकांवर बंद झाला. निफ्टी २५३ अंकांची घट नोंदवून २४ हजार ८८८ अंकांवर स्थिरावला. बांधकाम उद्योग, तेल आणि नैसर्गिक वायू, ऊर्जा, बँका यासह सर्वच क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग आज घसरले.