June 12, 2025 7:41 PM

views 30

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे ८२३ अंकांची घसरण

जागतिक बाजारातलं कमजोर वातावरण तसंच इराण आणि अमेरिकेत वाढलेल्या तणावामुळे देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स ८२३ अंकांनी घसरुन ८१ हजार ६९२ अंकांवर बंद झाला. निफ्टी २५३ अंकांची घट नोंदवून २४ हजार ८८८ अंकांवर स्थिरावला. बांधकाम उद्योग, तेल आणि नैसर्गिक वायू, ऊर्जा, बँका यासह सर्वच क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग आज घसरले. 

September 12, 2024 7:02 PM

views 67

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स विक्रमी उंचीवर

जागतिक बाजारातल्या सकारात्मक वातावरणाचे पडसाद आज देशातल्या शेअर बाजारांमधे उमटले आणि बाजार नव्या उच्चांकावर बंद झाले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं एक हजार ४३९ अंकांची झेप घेतली आणि तो दिवसअखेर ८२  हजार  ९६२ या विक्रमी पातळीवर  बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४७० अंकाची वाढ  नोंदवत २५ हजार ३८८ या उच्चांकावर बंद झाला. धातू, दूरसंचार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग तेजीत राहिले.