डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्य शासनाचं कृत्रिम बुद्धिमत्ता स्विकारण्याचं धोरण सुरू- मुख्यमंत्री

राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्ता स्विकारण्याचं धोरण सुरू केलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत वांद्रे इथं मेहबुब स्टुडिओत एचपी आणि इंटेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एचपी ड्रीम अनलॉक्ड’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. तंत्रज्ञान प्रत्येक भारतीयाच्या कल्पनांना आकार देऊ शकते असं ते म्हणाले. आजचा काळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा असून या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजात साक्षरता आणि समता निर्माण होऊ शकते असं त्यांनी सांगितलं. शासनानं एचपी सोबत डिजिटल मीडिया सेंटर ऑफ एक्सलन्स उभारलं असून सर्वसामान्यांना नव्या तंत्रज्ञानांचा, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रवेश सहज मिळावा यासाठी भागीदारीचा आराखडा तयार करण्याचं ठरवल्याची माहिती त्यांनी दिली. कृषीक्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू केल्याचं ते म्हणाले. तांत्रिक हस्तक्षेपांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान टळेल, खर्च कमी होईल आणि कृषीक्षेत्रात अधिक नफा मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.