डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

दोन दिवसीय स्टार्टअप कॉन्क्लेव्हला आजपासून सुरुवात

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्यावतीने आयोजित दोन दिवसीय स्टार्टअप कॉन्क्लेव्हला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन झालं. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. या परिषदेत ८०० पेक्षा जास्त प्रतिनिधी, वैज्ञानिक, ७० पेक्षा जास्त स्टार्टअप्स, औद्योगिक भागीदार, गुंतवणूकदार, शैक्षणिक संस्था आणि सरकारी यंत्रणांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.  स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि शासकीय प्रतिनिधींमधे संवाद घडवून आणण्याच्या उद्देशाने या परिषदेत विशेष संवाद आणि चर्चासत्रांचंही आयोजन करण्यात आलं आहे.