डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मुंबईत वांद्रे टर्मिनसवर झालेल्या चेंगराचेंगरीत ९ जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

मुंबईत वांद्रे टर्मिनसवर काल पहाटे प्रचंड गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी झाली, यात नऊ जण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे. वांद्रे टर्मिनस, इथल्या फलाट क्रमांक एक वर वांद्रे-गोरखपूर या गाडीत बसण्यासाठी मोठी गर्दी झाल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. दिवाळीसाठी आपल्या गावी जाणाऱ्या कामगारांचा या गर्दीत समावेश होता.

 

दरम्यान, दिवाळीनिमित होणारी अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर यासह रेल्वेच्या काही प्रमुख स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री येत्या आठ नोव्हेंबर पर्यंत बंद राहणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.