राज्यातल्या अधिकाधिक आस्थापनांनी SPREE – Scheme for Promotion of Registration of Employers and Employees या योजनेचा लाभ घेऊन ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा निगमकडे कामगारांची नोंदणी करावी असं आवाहन विमा आयुक्त रामजी लाल मीना यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. या योजनेंतर्गत १० पेक्षा अधिक लोक काम करत असलेल्या विविध आस्थापनांना ESIC वेबसाईटवर नोंदणी करता येईल. नोंदणी केल्याच्या दिवसाच्या आधीच्या कालावधी साठी त्याच्याकडून कुठलाही दंड किंवा शुल्क आकारले जाणार नाही, त्यांना जुने हफ्ते भरावे लागणार नाहीत, जुने ऑडिट होणार नाही किंवा नोंदणी पूर्व कालावधीसाठी कुठल्याही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार नाही. या योजनेची माहिती देताना जनसंपर्क अधिकारी जितेंद्र खैरनार म्हणाले.
याशिवाय ऑक्टोबरपासून एक amnesty स्कीम सुद्धा सुरू होणार आहे. या अंतर्गत ESIC आणि नोंदणीकृत संस्था यांच्यातील न्यायालयात गेलेले वाद तडजोडीने सोडवले जाणार आहेत. ३१ मार्च २०२५ पूर्वी दाखल झालेले वाद यासाठी पात्र असतील अशी माहिती पश्चिम विभागाच्या संचालक अभिलाषा झा यांनी दिली.