हॉकीची १०० वर्षं साजरी करण्यासाठी येत्या ७ नोव्हेंबर रोजी देशभरातल्या साडेपाचशेहून अधिक जिल्ह्यांमध्ये १ हजार ४०० हून अधिक हॉकी स्पर्धा आयोजित केल्या जातील, अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. या उपक्रमाचा उद्देश खेळाबद्दल व्यापक जागरुकता निर्माण करणं, तरुणांना हा खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करणं तसंच देशाची क्रीडा संस्कृती बळकट करणं हा आहे. यामुळे तरुणांना हॉकीचा इतिहास जाणून घेऊन त्यांचं भविष्य घडवण्यासाठी प्रेरणा मिळेल, असं मांडवीय म्हणाले.
Site Admin | November 3, 2025 7:14 PM | Sports Minister Mansukh Mandaviya
हॉकीच्या शतकपूर्तीनिमित्त देशभरातल्या जिल्ह्यांमध्ये हॉकी स्पर्धांचं आयोजन